Mumbai Indians : मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर आज मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians ) विरूद्ध सनरायझर्स हैदराबाद ( Sunrisers Hyderabad ) यांच्यात सामना रंगणार आहे. दरम्यान प्लेफॉचं गणित आता बऱ्यापैकी उलगडलेलं दिसतंय. गुजरात टायटन्स, लखनऊ सुपर जाएंट्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांनी प्लेऑफमध्ये धडक मारली आहे. माता चौथ्या स्थानासाठी रॉयल चॅलेंजर बंगळूरू ( Royal Challengers Bangalore ) , मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्या स्पर्धा पहायला मिळणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians ) विरूद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील सामना सुरु झाला असून मुंबईने टॉस जिंकून प्रथन गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. यावेळी मुंबई इंडियन्सला ( Mumbai Indians ) जर प्लेऑफचं तिकीट मिळवायचं असेल तर केवळ विजय मिळवून फायदा नाहीये. यावेळी त्यांना मिळालेलं लक्ष्य विशिष्ठ ओव्हर्समध्ये पूर्ण करावं लागणार आहे. पाहुयात हे समीकरण कसं आहे. 


प्रथम गोलंदाजीने मुंबईचं समीकरण बदललं


आजच्या सामन्यात रोहित शर्माने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. सनरायझर्स हैदराबाद पहिल्यांदा फलंदाजी करून मुंबईला विशिष्ठ रन्सचं आव्हान देईल. क्रिकबझच्या रिपोर्टनुसार, मुंबईला आजच्या सामन्यात जे आव्हान मिळेल ते फलंदाजांना 12 ओव्हर्स होण्यापूर्वी पूर्ण होणार आहे. यामुळे मुंबईच्या रनरेट सुधारेल. या रनरेटमुळे मुंबईची टीम रॉयल चॅलेंजर बंगळूरूलाही मागे टाकेल. परिणामी मुंबईच्या टीमला प्लेऑफचं तिकीट मिळणार आहे. 


गुजरातचा विजय हवाच...


आजच्या दिवशी दुसरा सामना हा गुजरात टायटन्स विरूद्ध रॉयल चॅलेंजर बंगळूरू यांच्यात रंगणार आहे. हा सामना गुजरातने जिंकला तर मुंबईसाठी प्लेऑफचा मार्ग सुकर होणार आहे. सध्याचं नेट रन रेट पाहता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु प्लेऑफसाठी पात्र ठरु शकतो. गुजरातविरुद्धचा सामना जिंकून आरसीबीची टीम प्लेऑफ गाठू शकते. मात्र मुंबईने हैदराबादविरुद्धच्या सामन्यात मोठा विजय मिळवून नेट रन रेटमध्ये मोठी उडी घेतली तर आरसीबीच्या अडचणी वाढू शकतात.


दोन्ही टीम्सची प्लेईंग 11


मुंबई इंडियन्स: ईशान किशन (विकेटकीपर), रोहित शर्मा (कर्णधार), कॅमरन ग्रीन, सूर्यकुमार यादव, नेहाल वढेरा, टिम डेविड, क्रिस जॉर्डन, पीयूष चावला, आकाश मधवाल, जेसन बेहरनडॉर्फ, कुमार कार्तिकेय


सनराइजर्स हैदराबाद: मयंक अग्रवाल, विवरांत शर्मा, एडेन मार्करम (कर्णधार), हेनरिच क्लासेन (विकेटकीपर), हॅरी ब्रूक, ग्लेन फिलिप्स, नीतीश रेड्डी, उमरान मलिक, सनवीर सिंह, मयंक डागर, भुवनेश्वर कुमार