Akash Madhwal MI vs GT IPL 2023 Qualifier 2: मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स (MI vs GT) यांच्यात आयपीएलचा क्वॉलिफारचा दुसरा सामना (Qualifier 2) खेळवला जाणार आहे. क्वॉलिफारच्या पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने आकाश मधवालच्या (Akash Madhwal) आक्रमक आणि सटीक गोलंदाजीच्या जोरावर लखनऊचा पराभव केला होता. या सामन्यात आकाश मधवालने 5 धावा देत 5 विकेट मिळवल्या होत्या. त्याच्या या कामगिरीची जोरदार कौतूक झालं. मात्र, तुम्हाला माहिती का? याच आकाश मधवालला त्याच्या फास्ट गोलंदाजीमुळे बॅन करण्यात आलं होतं. त्याच्या भावाने म्हणजे आशिष मधवाल (Ashish Madhwal) याने मुलाखतीमुळे हा किस्सा सांगितला आहे.


काय म्हणाला आशिष मधवाल?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आकाश इंजिनियरिंगनंतर नोकरी करत होता, तेव्हा लोक रोज यायचे आणि म्हणायचे आज कामावर जाऊ नको, आमच्या टीममध्ये खेळ. आम्ही तुला जास्त पैसे देऊ. त्याला क्रिकेटची आवड होती. मात्र, आकाशच्या बॉलिंगने बॅटरची भंबेरी उडायची, असंही आशिष सांगतो. आकाशने उत्तराखंडमध्ये चाचण्या घेतल्यानंतर लेदर बॉल खेळायला सुरुवात केली. आकाशला स्थानिक स्पर्धा खेळण्यापासून बंदी घालण्यात आली होती, कारण खेळाडू त्याला सामोरं जाण्यास घाबरत होते. 



स्थानिक स्पर्धांमध्ये त्याच्या गोलंदाजीची फलंदाजांना खूप भीती होती. त्यामुळे त्याच्यावर स्थानिक स्पर्धांपासून बंदी घालण्यात आली होती. आकाश मधवाल म्हणजे भीतीचं वातावरण होतं, असा किस्सा आशिषने सांगितला आहे. त्यावेळी आकाशने मुंबईचा कॅप्टन रोहित शर्मा (Rohit Sharma) याचं देखील कौतूक केलंय. 


आणखी वाचा  - 'काळजी करु नको, तुझा भाऊ आता...' जेव्हा पाथिरानाच्या बहिणीला धोनीने दिलं वचन!


रोहितचं कौतूक


रोहित बद्दल महत्त्वाची गोष्ट म्हणजे तो खेळाडूंना संधी देतो. तो आपल्या खेळाडूंवर विश्वास ठेवतो आणि त्यांना नेहमी पाठिंबा देतो. नवीन खेळाडूला संघातील त्याच्या स्थानाबद्दल नेहमीच भीती वाटते, पण रोहितने ही भीती दूर करत नेहमी संधी दिलीये. आकाश आता चांगली कामगिरी करत आहे, त्यामुळे आतचं देखील टेन्शन संपलंय, असं आकाशचा भाई आशिष याने म्हटलं आहे.