MS Dhoni Meet Mathisha Pathirana family: इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2023 चा फायनल सामना येत्या 28 मे रोजी खेळवला जाणार आहे. पहिल्या क्वॉलिफायर सामन्यात चेन्नईने गुजरातला पराभूत करत थेट फायनलचं तिकीट मिळवलं होतं. त्यानंतर आता चेन्नईचा संघ रिलॅक्स झाल्याचं पहायला मिळतंय. अशातच सामन्यापूर्वी आयपीएलच्या फायनलपूर्वी त्याचा सहकारी मथिशा पाथिरानाच्या कुटुंबाची भेट घेतली. त्यावर मथिशा पाथिरानाच्या बहिणीने (Mathisha Pathirana sister Emotional Post) भावूक पोस्ट लिहिली आहे.
यंदाच्या आयपीएलमध्ये (IPL 2023) आत्तापर्यंत चेन्नईसाठी 17 विकेट घेतलेल्या पथिरानाची जोरदार चर्चा झाली. डेथ ओव्हरमध्ये धोनीने (MS Dhoni) पाथिरानाच्या खांद्यावर मोठी जबाबदारी दिली आहे. धोनीचा हाच विश्वास पाथिरानाने सार्थ करून दाखवलाय. त्यामुळे तो सध्या धोनीचा विश्वासू खेळाडू बनलाय. अशातच आता धोनीने देखील आपल्या लाडक्या खेळाडूचं मन राखत त्याच्या कुटुंबियांची (MS Dhoni Meet Mathisha Pathirana family) भेट घेतली.
आणखी वाचा - GT vs MI: क्वॉलिफायर 2 च्या आकड्यांनी वाढवलं रोहितचं टेन्शन; मुंबई कशी करणार नौका पार?
पाथिरानाच्या कुटुंबियांसाठी हा भावूक क्षण होता. पाथिरानाच्या बहिणीने इंस्टाग्रामवर (Mathisha Pathirana Sister Instagram Post) धोनीसोबतच्या त्यांच्या भेटीचे हृदयस्पर्शी फोटो पोस्ट केले. हे फोटो सध्या इंटरनेटवर व्हायरल होत आहेत. त्यावेळी पाथिरानाची बहिण विशुखा पाथीरानाने पोस्ट करत भावना व्यक्त केल्यात.
आम्हाला खात्री आहे की आता आमचा मल्ली (Mathisha Pathirana) सुरक्षित हातात आहे. तुम्हाला मथिशाबद्दल काळजी करण्याची गरज नाही. तो नेहमी माझ्यासोबत असतो, असं थाला मथिशाच्या बहिणीला म्हणाला होता. हा क्षण माझ्यासाठी माझ्या स्वप्नांच्या पलीकडचा होता, असं म्हणत मथीशा पथिरानाची बहिणीने म्हणजेच विशुखा पाथीरानाने समाधान व्यक्त केलंय.
दरम्यान, स्लिंगिंग-आर्म बॉलिंग अॅक्शनमुळे श्रीलंकेच्या पाथीरानाची तुलना लसिथ मलिंगाशी केली जाते. फक्त 20 वर्षाच्या या गोलंदाजाने श्रीलंकेच्या संघात स्थान मिळवलंय. अफगाणिस्तानविरुद्ध पाथीरानाने डेब्यु केला असून आता तो आयपीएलमध्ये चेन्नईच्या संघाकडून खेळतो.