मुंबई : IPL 2022 मेगा लिलावात खेळाडूंना नव्याने खरेदी केलं जाईल, त्याआधी सर्व फ्रँचायझींना 4 खेळाडूंची कायम ठेवण्याची यादी सादर करावी लागेल. सर्व संघांच्या मालकांनी त्यांच्या आवडत्या खेळाडूंना जवळपास शॉर्टलिस्ट केलं आहे.


मुंबई इंडियंसचा काय आहे प्लान?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

5 वेळा आयपीएल चॅम्पियन मुंबई इंडियन्सच्या मालकांसाठी 4 खेळाडूंची निवड करणं खूप कठीण काम आहे. कारण या संघात अनेक 'मॅच विनर्स' आहेत. 


या 4 खेळाडूंना रिटेन करणार मुंबई इंडियंस!


कर्णधार रोहित शर्माचे नाव मुंबई इंडियन्सच्या कायम ठेवण्याच्या यादीत निश्चित झालं आहे. या फ्रँचायझीला 'हिटमॅन'चे आभार मानून सहावं जेतेपद जिंकायचे आहे. याशिवाय स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला संघात कायम ठेवण्यात येणार आहे. 


मुंबईचे मालक मेगा लिलावात सूर्यकुमार यादवला विकत घ्यायचं आहे. म्हणजे विकेटकीपर-फलंदाज इशान किशनला कायम ठेवता येईल. त्याचवेळी अष्टपैलू खेळाडू किरॉन पोलार्डशी चर्चा सुरू आहे, जर तो सहमत झाला तर मुंबईत कायम ठेवणारा तो एकमेव परदेशी खेळाडू असेल.


हार्दिक पांड्याचा पत्ता होणार कट?


मुंबई इंडियन्सकडून हार्दिक पांड्याचा पत्ता कापला जाणार असल्याची शक्यता आहे. कारण गेल्या मोसमातील त्याची कामगिरी फ्लॉप होती आणि सध्या तो गोलंदाजी करण्याच्या स्थितीत नाही. त्याचा भाऊ कृणाल पांड्याबाबतही परिस्थिती स्पष्ट नाहीये.


30 नोव्हेंबरपर्यंत यादी अंतिम होणार


आयपीएल 2022 मेगा लिलावाच्या दृष्टीने, जुन्या आयपीएल फ्रँचायझींना 30 नोव्हेंबरपर्यंत कायम ठेवलेल्या खेळाडूंची यादी सादर करावी लागेल. 2 नवीन संघांना लिलावापूर्वी काही खेळाडू खरेदी करता येतील अशी सूट असेल, कारण त्यांच्याकडे कायम ठेवण्याचा पर्याय नाही.