मुंबई : सध्या दक्षिण आफ्रिकेतील बॉल टॅम्परिंगचा मुद्दा जोरदार गाजतो आहे. ऑस्ट्रेलियाच्या स्मिथ आणि कंपनीने बॉल टॅम्परिंग केल्याचे उघड झाले आहे. त्यांची ही चोरी कॅमेऱ्यात कैद झाली आहे. त्यानंतर खूप मोठा वादंग झाला. झी २४ तासचे विशेष क्रीडा प्रतिनिधी सुनंदन लेले यांनी  बॉल टॅम्परिंग म्हणजे काय... ते कसे केले जाते... काय ट्रिक्स वापरल्या जातात. याचे प्रात्याक्षिक दाखविले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 



 


अशी झाली बॉलशी छेडछाड


दक्षिण आफ्रिकेच्या दुस-या डावातील ४३ व्या षटकात ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर असलेला क्रिकेटपटू बेनक्रॉफ्ट बॉलशी छेडछाड करताना दिसला. बॉलला स्विंग मिळावा यासाठी त्याच्याकडून बॉलला टेप लावण्याचा प्रयत्न करण्यात येत होता. त्यामुळे बॉल खेळपट्टीवर आदळून स्विंग मिळेल असं सांगण्यात येतं.


बेन्क्रॉफ्टचा रडीचा डाव पंचाच्या लक्षात आला तेव्हा त्यांनी याबाबत विचारणा केली. सुरुवातीला बेन्क्रॉफ्टनं या सगळ्या गोष्टी नाकारल्या. मात्र मैदानातील बड्या स्क्रीनवर बेन्क्रॉफ्टचा रडीचा डाव दाखवला गेला आणि तो गोंधळला. तिस-या दिवसाच्या खेळानंतर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथनं बेन्क्रॉफ्टच्या बॉलशी छेडछाडीची जबाबदारी स्वीकारली.