आयपीएल २०१९ | अल्झारी जोसेफने हैदराबादचा डाव गुंडाळला, मुंबईचा ४० रनने विजय
अल्झारी जोसेफ आणि पोलार्ड हे दोघे या विजयाचे शिल्पकार ठरले आहेत.
हैदराबाद : हैदराबाद विरुद्धातील मॅचमध्ये पाहुण्या मुंबईने यजमानांचा ४० रनने पराभव केला आहे. अल्झारी जोसेफच्या बॉलिंगसमोर कोणत्याच बॅट्समनला टिकता आले नाही. अल्झारी जोसेफने तब्बल ६ विकेट घेण्याची कामगिरी केली आहे. मुंबईने हैदराबादला विजयासाठी केवळ १३७ रनचे माफक आव्हान दिले होते. हैदराबादला केवळ ९६ रनच करता आल्या. हैदराबाला २० ओव्हर देखील खेळता आले नाही. हैदराबादची इनिंग १७.४ ओव्हरमध्येच ऑलआऊट झाली.
राहुल चहरने २ तर बुमराह आणि बेहरनडोर्फने प्रत्येकी १ विकेट घेत जोसेफला चांगलीच साथ दिली. अल्झारीने ३.४ ओव्हर टाकल्या. त्यातही १ ओव्हरही निर्धाव टाकली. त्याने केवळ १२ रन देत ६ विकेट घेण्याची कामगिरी केली. अल्झारी जोसेफ आणि पोलार्ड हे दोघे या विजयाचे शिल्पकार ठरले आहेत.
विजयासाठी दिलेल्या १३७ रनचे आव्हानाचं पाठलाग करायला आलेल्या हैदराबादची सुरुवात चांगली झाली होती. पण पहिली विकेट गेल्यानंतर हैदराबादने नियमित अंतराने आपले विकेट गमावले. हैदराबाडकडून दीपक हुड्डाने २० रनची सर्वाधिक खेळी केली.
यापूर्वी हैदराबादने टॉस जिंकून मुंबईला बॅटिंगसाठी आंमत्रित केले. मुंबईची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. परंतू अखेरच्या टप्प्यात पोलार्डने केलेल्या फटकेबाजीमुळे मुंबईला १३६ रन करत्या आल्या. या विजयामुळे या पर्वातील मुंबईचा हा तिसरा विजय ठरला आहे. मुंबई टीम चेन्नई नंतर हैदराबादची विजयी घौडदोड थांबवण्यास यशस्वी ठरली आहे.