मुरली विजयने सांगितले IPL मधील धोनीच्या यशाचे रहस्य...
दोन वर्षानंतर चेन्नई सुपर किंग्सची टीम पुन्हा एकदा आयपीएलमध्ये परतणार आहे.
नवी दिल्ली : दोन वर्षानंतर चेन्नई सुपर किंग्सची टीम पुन्हा एकदा आयपीएलमध्ये परतणार आहे. टीमचे नेतृत्व महेंद्र सिंग धोनीच्या हाती आहे. त्याच्या नेतृत्वातील ही आयपीएलमधील सर्वात यशस्वी टीम आहे. त्याच्या कर्णधारपदावर कोणालाही शंका नाही. त्यामुळेच की काय चेन्नई सुपर किंग्सचा खेळाडू मुरली विजय महेंद्र धोनीचे तोंडभरुन कौतूक करत होता. एका मुलाखतीत त्याने सांगितले की, महेंद्र सिंग धोनी आयपीएलचा सर्वात यशस्वी कर्णधार आहे.
यंदा अश्विनऐवजी हरभजन सिंगला टीममध्ये घेण्यात आले आहे. तर मुलरी विजयचा समावेशही टीममध्ये करण्यात आला आहे. अश्विन सध्या किंग्स इलेवन पंजाबची जबाबदारी सांभाळत आहे.
मुरली विजयने केले तोंडभरुन कौतूक
मुरली विजयने एका मुलाखतीत धोनीच्या कर्णधारपदाविषयी विचारण्यात आले तेव्हा तो म्हणाला की, तो आपल्या खेळाडूंना स्वातंत्र देतो. आणि एका खेळाडूसाठी ही खूप मोठी गोष्ट असते. एका लीडरकडून अशी आशा करणे महत्त्वाचे असते.
पुढे तो म्हणाला की, त्याच्याशी बोलून त्याच्याकडून काही शिकलो तर आम्हालाच त्याचा फायदा होईल. आपल्या मनाप्रमाणे खेळण्याचे स्वातंत्र्य धोनी देतो. आपल्या घरच्या टीमचा भाग होणे यासारखा आनंद नाही. चेन्नई सुपरकिंग्सचा भाग झाल्याने मी खूप आनंदीत आहे. पुन्हा एकदा चेन्नईसाठी खेळण्याचा आनंद मी शब्दात व्यक्त करु शकत नाही.