Duleep Trophy 2024 : डेब्यू सामन्यातच मुशीर खानचा जलवा; मोडला 33 वर्ष जुना `क्रिकेटच्या देवा`चा रेकॉर्ड
Musheer Khan Break Sachin`s Record : भारताचा युवा खेळाडू मुशीर खान याने आपल्या फलंदाजीची जादू दाखवली असून त्याने सचिन तेंडूलकरचा रेकॉर्ड मोडलाय.
Duleep Trophy India A vs India B : आंतरराष्ट्रीय मंचावरून थोडा ब्रेक मिळाल्यानंतर भारतीय खेळाडू दुलीप ट्रॉफीमध्ये कसून सराव करत आहेत. दुलीप ट्रॉफी 2024 स्पर्धेत इंडिया ए आणि इंडिया बी संघात सामना खेळवला जातोय. तिसरा दिवस संपेपर्यंत सामना अधिक रंजक स्थितीत आला आहे. इंडिया बी संघाने पहिल्या डावात 321 धावा केल्या होत्या. त्याला प्रत्युत्तर देताना इंडिया ए संघाला फक्त 231 धावा उभारल्या आल्या. त्यानंतर आता दुसऱ्या डावात इंडिया बी संघाने आत्तापर्यंत 6 गडी गमावून 150 धावा केल्या आहेत. मात्र, संपूर्ण सामन्यात चर्चा झाली ती, सरफराज खानचा छोटा भाऊ मुशीर खान याच्या 181 धावांच्या वादळी खेळीची...
सचिनचा रेकॉर्ड मोडला
होय, युवा क्रिकेटर सरफराज खान याचा धाकटा भाऊ मुशीर खान याने इंडिया ए विरुद्ध दमदार खेळी करून बीसीसीआयचे दरवाजे खटखटवले आहेत. तर त्याने या सामन्यात क्रिकेटच्या देवाचा म्हणजे सचिन तेंडूलकरचा देखील रेकॉर्ड मोडलाय. दुलीप ट्रॉफीच्या पदार्पणात मुशीरने तिसऱ्या क्रमांकाची वैयक्तिक धावसंख्या नोंदवली. त्यामुळे आता सचिन तेंडूलकरचा रेकॉर्ड मोडला गेलाय. सचिनने 1991 मध्ये पश्चिम विभागाकडून पदार्पण करताना पूर्व विभागाविरुद्ध 159 धावांची दमदार इनिंग खेळली होती.
आता मुशीर खानने 181 धावांची खेळी केली अन् सचिनला मागे टाकलंय. याआधी बाबा अपराजित याने 212 धावा केल्या होत्या तर खान यश याने 193 धावांची खेळी केली होती. त्यानंतर आता मुशीर खानचा नंबर लागलाय. पहिल्या डावात 181 धावा केल्यानंतर दुसऱ्या डावात मुशीरला भोपळा देखील फोडता आला नाही. मुशीर दुसऱ्या डावात शुन्यावर बाद झाला.
तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या मुशीरने संयमी खेळी केली अन् उसळी घेणाऱ्या पीचवर पाय रोवले. मुशीरने 373 बॉलचा सामना केला अन् 181 धावा केल्या. यावेळी त्याने 16 फोर अन् 5 खणखणीत सिक्स देखील मारले. मुशीरची खेळी संघासाठी फायद्याची ठरली. आठव्या गड्यासाठी मुशीर खान आणि नवदीप सैनीने 212 चेंडूत 108 धावांची भागीदारी केल्याने इंडिया बी संघाने सुटकेचा श्वास घेतला होता.
भारत ए (प्लेइंग इलेव्हन): शुबमन गिल (कर्णधार), मयंक अग्रवाल, केएल राहुल, रियान पराग, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), शिवम दुबे, तनुष कोटियन, कुलदीप यादव, आकाश दीप, आवेश खान, खलील अहमद.
भारत बी (प्लेइंग इलेव्हन): अभिमन्यू ईश्वरन (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, सरफराज खान, ऋषभ पंत (विकेटकीपर), मुशीर खान, नितीश रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, रविश्रीनिवासन साई किशोर, मुकेश कुमार, नवदीप सैनी, यश दयाल.