Musheer Khan Duleep Trophy 2024 : भारतीय क्रिकेटमध्ये यापूर्वी भावाभावांच्या काही जोड्या खेळल्या आहेत. यात इरफान - युसुफ पठाण, कृणाल - हार्दिक पंड्या यांचा समावेश आहे. मात्र आता मुंबईतील दोन भाऊ सरफराज खान आणि मुशीर खान क्रिकेटमध्ये दमदार परफॉर्मन्स देऊन आपली नवी ओळख बनवत आहेत. अंडर 19 आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये आपल्या फलंदाजीने दोघांनी सर्वांना इम्प्रेस केले होते. सध्या ही भावाभावांची जोडी दुलीप ट्रॉफीमध्ये टीम बी कडून खेळताना दिसत आहे. यात मोठा भाऊ सरफराज टीमसाठी चांगली कामगिरी  करण्यात फ्लॉप ठरला होता, परंतु लहान भाऊ मुशीरने टीम संकटात असताना मैदानात उभं राहून जबरदस्त फलंदाजी केली.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काही महिन्यांपूर्वीच इंग्लंड विरुद्ध झालेल्या टेस्ट सिरीजमध्ये सरफराज खानचे टीम इंडियाकडून टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण झाले होते. त्यानंतर अंडर 19 वर्ल्ड कपमध्ये मुशीर खानने सुद्धा दमदार फलंदाजी केली होती. त्यानंतर दोघांना दुलीप ट्रॉफीमध्ये खेळण्याची संधी मिळाली आहे. 5 सप्टेंबर रोजी इंडिया ए आणि बी विरुद्ध सामना खेळवण्यात आला. या सामन्यात टीम ए चा कॅप्टन शुभमन गिल याने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.  यावेळी टीम ए ची गोलंदाजी टीम बी वर भारी पडताना दिसली. यात यशस्वी जयस्वाल 30 धावा केल्या. वॉशिंग्टन सुंदर आणि नितेश रेड्डी यांना तर खातं सुद्धा उघडता आलं नाही. तर ऋषभ पंत (7) आणि सरफराज खान (9) यांना सुद्धा समाधानकारक कामगिरी करता आली नाही. त्यामुळे परिणामी टीम बी चा स्कोअर 7 विकेट्सवर 94 धावा असा होता.


कॅप्टन शुभमनने घेतला अफलातून कॅच, हवेत उडी मारून ऋषभ पंतला स्वस्तात पाठवलं माघारी Video


 


टीम संकटात असताना मुशीर खान मैदानात टिकून राहिला. बातमी लिहीत असे पर्यंत मुशीरने 100 धावांची कामगिरी केली होती या दरम्यान त्याने 10 चौकार आणि 2 सिक्स लगावले. अंडर 19 वर्ल्ड कप सारखाच मुशीरने दुलीप ट्रॉफीमध्ये सुद्धा दम दाखवला.  बुधवारी दुलीप ट्रॉफीच्या सामन्यात एकावेळी सरफराज खान आणि मुशीर हे दोन भाऊ एकत्र फलंदाजी करत होते. कॅप्टन अभिमन्यू ईश्वरनची विकेट पडल्यावर मुशीर खान मैदानात आला तर यशस्वी जयस्वाल बाद झाल्यावर सरफराज खान फलंदाजीसाठी आला. मात्र सरफराज त्याला केवळ 9 धावांची कामगिरी करता आली. आवेश खानने त्याला LBW आउट केले. 


लहान भाऊ मुशीरने ठोकलं शतक : 


जेव्हा टीम बी एकामागोमाग एक विकेट गमावत होती तेव्हा मुशीरने संकटात असलेल्या टीमला सावरण्यासाठी मोठी कामगिरी केली. मुशीरने 118 बॉल खेळाडूं 6 चौकार ठोकत अर्धशतक पूर्ण केले. तर त्यानंतर पुढील 87 बॉल खेळत असताना शतक पूर्ण केले.