Ranji Trophy : थोरल्याला जमलं नाही पण धाकट्याने करून दाखवलं, मुशीर खानने ठोकलं खणखणीत द्विशतक!
Ranji Trophy quarter final : मुंबई आणि बडोदा (mumbai vs baroda) यांच्यात खेळवल्या जात असलेल्या रणजी सामन्यात मुंबईने प्रथम फलंदाजी करताना 384 धावा उभ्या केल्या. त्यात एकट्या मुशीरने (Musheer Khan Double ton) 203 रन्स ठोकले.
Musheer Khan Double ton : टीम इंडियाचा युवा खेळाडू सरफराज खान (sarfaraz khan) याने कसोटी क्रिकेटमध्ये दमदार पदार्पण केलं आहे. तिसऱ्या कसोटी सामन्यात सरफराज खानला टीम इंडियाकडून खेळण्याचा संधी मिळाली आणि त्याने त्या संधीचं सोनं देखील केलं. तर दुसरीकडे सरफराज खानच्या धाकट्या भावाने म्हणजे मुशीर खान (Musheer Khan) याने देखील अंडर -19 वर्ल्ड् कपमध्ये धुंवाधार खेळी करत टीम इंडियाला फायनलमध्ये पोहोचवलं होतं. अशातच आता मुशीर खान याने रणजी ट्रॉफीच्या क्वाटर फायनलमध्ये (Ranji Trophy quarter final) धमाकेदार द्विशतक ठोकल्याचं पहायला मिळतंय. मुशीर खानने नॉट आऊट 203 धावांची खेळी केली. त्यामुळे आता थोरल्या भावाला जमलं नाही ते धाकट्याने करून दाखवलं, अशी चर्चा होताना दिसत आहे.
मुंबई आणि बडोदा यांच्यात खेळवल्या जात असलेल्या रणजी सामन्यात मुंबईने प्रथम फलंदाजी करताना 384 धावा उभ्या केल्या. त्यात एकट्या मुशीरने 203 रन्स ठोकले. एकीकडे मुंबईचा संघ अडचणीत सापडला असताना मुशीर देवासारखा धावून आला अन् मुंबईला संकटातून बाहेर काढलं. 86 वर तीन गडी बाद अशी परिस्थिती असताना मुशीरने एक बाजू लावून धरली अन् 18 फोरच्या मदतीने द्विशतक ठोकलं. कॅप्टन अजिंक्य रहाणे आणि पृथ्वी शॉ सारख्या खेळाडूंना काहीही करता आलं नसलं तरी मुशीरने मात्र संयमी खेळी केली अन् मुंबईसाठी संकटोमोचक ठरला.
मुशीर खान मुंबईकडून द्विशतक ठोकणारा दुसरा युवा फलंदाज ठरला आहे. त्याआधी वसीम जाफर याने 1996 मध्ये 18 वर्ष 262 दिवसांचा असताना द्विशतक ठोकण्याचा पराक्रम गाजवला होता. दरम्यान, इंग्लंडविरुद्धच्या टेस्ट सामन्यातील पहिल्या डावात टीम इंडिया अडचणीत सापडली. त्यावेळी मैदानात असलेल्या सरफराज खानकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. मात्र, सरफराज खानला टीम इंडियाला अडचणीतून बाहेर काढला आलं नाही. त्यामुळे मोठ्याला जमलं नाही पण बारकऱ्याने करून दाखवलं, असं म्हटलं जात आहे.
मुंबईचा संघ - पृथ्वी शॉ, भूपेन लालवाणी, हार्दिक तामोरे (WK), अजिंक्य रहाणे (C), सूर्यांश शेडगे, शम्स मुलानी, मुशीर खान, शार्दुल ठाकूर, तनुष कोटियन, मोहित अवस्थी, तुषार देशपांडे.
बडोदाचा संघ - ज्योत्स्निल सिंग, शाश्वत रावत, विष्णू सोळंकी (C), शिवालिक शर्मा, मितेश पटेल (WK), महेश पिठिया, प्रियांशू मोलिया, भार्गव भट्ट, लुकमान मेरीवाला, निनाद रथवा, राज लिंबानी.