VIDEO: सुपरमॅन बनत या विकेटकीपरने पकडली कॅच
क्रिकेटमध्ये बॉलिंग आणि बॅटिंगला जेवढं महत्व आहे तेवढचं महत्व फिल्डिंगलाही आहे. मॅचमध्ये एखाद्याने कॅच ड्रॉप केली तर त्यामुळे पराभवही स्विकारावा लागतो.
नवी दिल्ली : क्रिकेटमध्ये बॉलिंग आणि बॅटिंगला जेवढं महत्व आहे तेवढचं महत्व फिल्डिंगलाही आहे. मॅचमध्ये एखाद्याने कॅच ड्रॉप केली तर त्यामुळे पराभवही स्विकारावा लागतो.
बांगलादेशच्या क्रिकेट टीमचं तसं खास कौतुक होताना पहायला मिळत नाही. मात्र, सध्या बांगलादेशच्या टीमने गेल्या काही वर्षांत घेतलेल्या मेहनतीमुळे आपलं वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न ते करत आहेत.
बांगलादेशच्या टीमने ऑस्ट्रेलियाला पहिल्या टेस्ट मॅचमध्ये २० रन्सने पराभूत करत सर्वांनाच एक आश्चर्याचा धक्का दिला. दुस-या टेस्ट मॅचमध्ये बांगलादेशचा कॅप्टन आणि विकेटकीपर मुशफिकुर रहीम याने ६८ रन्सची धडाकेबाज इनिंग खेळली. इतकेच नाही तर त्याने मॅट रेनशॉ याला आऊट करण्यासाठी एक जबरदस्त कॅचही घेतली.
मुस्ताफिजुर रहमान याच्या बॉलिंगवर रेनशॉ याने स्क्वेअर लेग खेळण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याच दरम्यान मुशफिकुर रहीम याने सुपरमॅनसारखी उडी घेत कॅच पकडली.
दरम्यान, सीरिज सुरु होण्यापूर्वी बांगलादेश टीमचा कॅप्टन मुशफिकुर रहीम याने दावा केला होता की, घरच्या मैदानाचा फायदा घेत ऑस्ट्रेलियाविरोधात आम्ही जिंकण्याचा प्रयत्न करु.