नवी दिल्ली: मैदानात सामन्या दरम्यान विरुद्ध संघासोबत अनेकदा वाद होत असल्याचे प्रकार घडत असतात. कधी पंचांच्या निर्णयसाठी तर कधी चुकीसाठी तर कधी स्लेजिंगसाठी. पण मैदानात तर चक्क डान्स केल्यानंतर दोन जण भिडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

झिम्बाबे आणि बांग्लादेश यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्या दरम्यान हा प्रकार झाला. झिम्बाबेने 220 धावा केल्या. हा सामना धावांमुळे नाही तर त्यामध्ये झालेल्या भांडणामुळे जास्त लक्षात राहणारा आहे. सामन्या दरम्यान बांग्लादेशच्या तस्कीन अहमद आणि झिम्बावेचा ब्लेसिंग मुजरबानी यांच्यात मैदानात वाद झाला. 




यावेळी बांग्लादेशच्या फलंदाजाने शॉट खेळल्यानंतर तुफान डान्स केला. हा डान्स पाहून झिम्बावेच्या खेळाडूला खूप राग आला. त्यामुळे या दोघांमध्ये वाद उसळळला.


झिम्बाब्वेचा फास्ट बॉलर ब्लेसिंग मुजराबानी याच्या एक शॉर्ट बॉलवर बांगलादेशच्या तस्कीन अहमद चुकला आणि बॉल विकेटकीपरकडे गेला. अशा परिस्थितीत तस्कीन अहमदने चेंडू मिस केल्यानंतर विचित्र पद्धतीने प्रतिक्रिया दिली, हे पाहून गोलंदाज संतापला.