लंडन : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये खेळताना भारताचा धडाकेबाज क्रिकेटर युवराज सिंग ३००वी वनडे खेळणार आहे. बांगलादेशविरुद्धच्या सेमीफायनलच्या सामन्यात त्याला फलंदाजी करता आली नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिखर धवन, रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी बांगलादेशविरुद्धचे आव्हान सहज पूर्ण केल्याने पुढील क्रिकेटपटूंना फलंदाजी करण्याची संधीच मिळाली नाही. 


सेमीफायनल सामन्याआधी युवराज सिंगशी खास बातचीत झाली. यावेळी आतापर्यंतच्या कारकिर्दीत त्याच्या फेव्हरिट कर्णधाराबद्दल त्याला विचारले असता त्याने सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली आपली कारकीर्द बहरल्याचे सांगितले. 


माझा आवडता कर्णधार सौरव गांगुली होता. मला त्याच्याकडून खूप काही शिकता आले. माझी कारकीर्द त्याच्या नेतृत्वाखाली बहरली, असे युवराज म्हणाला.