नवी दिल्ली : दरवर्षी खेळाडूंना देण्यात येणा-या राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यात टीम इंडियाचा क्रिकेटर चेतेश्वर पुजारा आणि महिला संघातील धडाकेबाज खेळाडू हरमनप्रीत कौर यांना अर्जुन पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

येत्या २९ ऑगस्ट रोजी राष्ट्रपती भवनात होणाऱ्या विशेष कार्यक्रमात पुरस्कारांचं वितरण केलं जाईल. 


यावर्षी पुरस्कारांसाठी मोठ्या प्रमाणात नामांकन मिळाले होते. माजी ऑलिम्पिक खेळाडू, अर्जुन पुरस्कार प्राप्त खेळाडू, द्रोणाचार्य पुरस्कार प्राप्त प्रशिक्षक, ध्यानचंद पुरस्कार प्राप्त व्यक्ती, क्रीडा पत्रकार, जाणकार, समालोचक आणि क्रीडा विभागाच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या समितीने पुरस्कारासाठी खेळाडूंची निवड केली. राजीव गांधी आणि अर्जुन पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष न्यायमूर्ती सी. के. ठक्कर होते. तर द्रोणाचार्य आणि ध्यानचंद पुरस्कारांच्या निवड समितीचे अध्यक्ष पुलेला गोपीचंद होते.


राजीव गांधी खेलरत्न २०१७


देवेंद्र झाजरिया, पॅरा एथलिट
सरदार सिंह, हॉकी


अर्जुन पुरस्कार २०१७


चेतेश्वर पुजारा, क्रिकेट
हरमनप्रीत कौर, क्रिकेट
व्ही. जे. सुरेखा, तिरंदाज
खुशबीर कौर, अॅथलेटिक्स
अरोकिया राजीव, अॅथलेटिक्स
प्रशांती सिंह, बास्केट बॉल
सुभेदार लैशराज देबोंद्रो सिंह, बॉक्सिंग
ओइनम बेम्बम देवी, फूटबॉल
एस. एस. पी. चौरसिया, गोल्फ
एस. व्ही. सुनील, हॉकी
जसवीर सिंह, कबड्डी
पी. एन. प्रकाश, नेमबाज
ए. अमलराज, टेबल टेनिस
साकेत मिनेनी, टेनिस
सत्यवर्त कादियान, कुस्ती
मरियप्पन, पॅरा अॅथलिट
वरुण सिंह भाटी, पॅरा अॅथलिट


द्रोणाचार्य पुरस्कार २०१७


स्‍व. डॉ. आर. गांधी अॅथलेटिक्‍स
हिरानंद कटारिया, कबड्डी
जी. एस. एस. व्ही. प्रसाद, बॅडमिंटन
ब्रिज भूषण मोहंती, बॉक्सिंग
पी. ए. राफेल, हॉकी
संजॉय चक्रवर्ती, नेमबाजी
रोशन लाल, कुस्ती


ध्यानचंद पुरस्कार २०१७


भूपेंद्र सिंह, अॅथलेटिक्स
सय्यद शाहीद हकीम, फूटबॉल
सुमाराई टेटे, हॉकी