Video : छोटा विराट म्हणून व्हायरल होतोय भारताचा गोल्डन बॉय, व्हिडीओ पाहून तुम्हीच ठरवा!
चार फुटांच्या नवदीपने रेकॉर्ड ब्रेक कामगिरी केल्यावर त्याने अग्रेसिव्ह सेलिब्रेशन केले त्याला पाहून लोकांना विराट कोहलीची आठवण आली. सध्या नवदीप सिंहचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Navdeep Singh Paris Paralympics 2024 : पॅरिस पॅरालिम्पिक 2024 मध्ये भारतीय खेळाडूंनी पदकांची लयलूट केली असून आतापर्यंत भारताच्या खात्यात एकूण 29 पदकांची समावेश झाला आहे. यात 7 सुवर्ण, 9 रौप्य आणि 13 कांस्य पदकांचा समावेश आहे. रविवारी भालाफेकच्या F41 कॅटेगरीमध्ये भारताच्या नवदीप सिंहने सुवर्ण पदक जिंकले. चार फुटांच्या नवदीपने रेकॉर्ड ब्रेक कामगिरी केल्यावर त्याने अग्रेसिव्ह सेलिब्रेशन केले त्याला पाहून लोकांना विराट कोहलीची आठवण आली. सध्या नवदीप सिंहचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
नवदीप सिंहने रचला इतिहास :
भालाफेकपटू नवदीप सिंहला F41 स्पर्धेत नशिबाने साथ दिली. त्याने या स्पर्धेत रौप्य पदक जिंकले होते, परंतु सुवर्ण पदक विजेत्या इराणच्या खेळाडूने विवादास्पद झेंडा दाखवल्याने त्याला स्पर्धेतून बाद केले. ज्यामुळे नवदीप सिंह हा सुवर्ण पदकाचा मानकरी ठरला. नवदीप F41 स्पर्धेत गोल्ड मेडल जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला.
नवदीप सिंहचा व्हिडीओ व्हायरल :
भालाफेकपटू नवदीप सिंह याने F41 स्पर्धेच्या अंतिम फेरीत त्याने 46.32 मीटर भाला फेकला. नवदीपने हा थ्रो केल्यावर त्याने अग्रिसेव्ह सेलिब्रेशन केले. त्याने दूर भाला फेकल्यावर उद्या मारल्या यावेळी त्याच्या तोंडून शिवी सुद्धा निघाली. नवदीपचं हे सेलिब्रेशन पाहून सर्वांना विराट कोहलीची आठवण झाली. विराट कोहली सुद्धा त्याच्या टीममधील कोणत्या गोलंदाजाने विकेट घेतल्यावर अशा प्रकारे अग्रेसिव्ह सेलिब्रेशन करतो. नवदीपचा चेहरा सुद्धा थोडा फार विराट सारखाच दिसतो. त्यामुळे नेटकऱ्यांनी त्याला जॅवलिन थ्रो मधला विराट कोहली असं म्हटल आहे. नवदीपने दिलेल्या मुलाखतीत त्याचा स्वॅग पाहून नेटकरी इम्प्रेस झाले आहेत.
कोण आहे नवदीप सिंह :
नवदीप सिंह हा 24 वर्षांचा असून त्याच्या हाईटमुळे त्याला अनेकजण चिडवायचे. नवदीप हा हरियाणाचा असून तो जाट तोमर कुटुंबातून येतो. त्याचे वडील शेतकरी असून त्यांची दुधाची डेअरी सुद्धा आहेत. नवदीप सिंहची उंची केवळ 4 फूट 4 इंच असल्याने सर्वजण त्याला चिडवायचे. नवदीपचे वडील राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू होते. जेव्हा नवदीप 2 वर्षांचा झाला तेव्हा कळले की त्यांच्या मुलाची उंची वाढू शकत नाही. पण त्यांनी आपल्या मुलाला साथ दिली आणि नवदीपला लहानपणापासूनच ॲथलेटिक्सची आवड असल्याने त्याने भालाफेकीत करिअर करण्याचे निश्चित केले. नवदीपने 2017 मध्ये आशियाई युवा पॅरा गेम्समध्ये सुवर्णपदक जिंकून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. तसेच त्याने 2021 मध्ये वर्ल्ड पॅरा ग्रँड प्रिक्समध्ये सुवर्ण तर 2024 वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक पदकाची कमाई केली.