Rohit Pawar Ind vs nz : न्यूझीलंड विरूद्ध तिसरा टी20 सामना (India vs New Zealand) टीम इंडियाने 168  धावांनी जिंकला. या विजयासह टीम इंडियाने (Team India) तीन सामन्यांची टी20 मालिका 2-1 जिकंली. टीम इंडियाच्या विजयाचा शिल्पकार शुबमन गिल (Shubman Gill), कर्णधार हार्दीक पंड्या (Hardik Pandya) आणि सुर्यकुमार यादव ठरला आहे. शुबमन गिलने नाबाद 126 धावांची खेळी केली होती, तर हार्दीक पंड्याने 4 विकेट घेतल्या होत्या आणि सुर्याने तीन भन्नाट कॅच पकडल्या होत्या. या खेळाडूंच्या कामगिरीमुळे टीम इंडियाने मालिका खि्शात घातली होती. टीम इंडियाच्या या विजयाची चर्चा सुरु असतानाच आता एका फोटोची खुप चर्चा रंगली आहे. या फोटोचा महाराष्ट्राच्या राजकारणाशी खुप मोठा संबंध आहे. नेमकं या फोटोत आहे तरी काय हे जाणून घेऊयात... 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 


हे ही वाचा : मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजीची ताकद वाढणार, 'हा' खेळाडू फिट


 


फोटोत काय?


न्यूझीलंड विरूद्ध तिसरा टी20 सामना पाहण्यासाठी (India vs New Zealand) टीम इंडियाच्या अनेक फॅन्सने अहमदाबादच्या स्टेडियमवरही मोठी गर्दी केली होती. क्रिकेट फॅन्सचंच नव्हे तर हा सामना पाहण्यासाठी राजकीय नेत्यांनीही मोठी हजेरी लावली होती. बीसीसीआयचे सचिव जय शहा (Jay shah) आणि खजिनदार व भाजप नेते आशिष शेलारही (Ashish Shelar) उपस्थित होते. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल देखील आले होते. तसेच राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी देखील या सामन्याला हजेरी लावली होती. या सर्व नेत्यांसमवेत विशेष गॅलरीत बसून रोहित पवार (Rohit Pawar) यांनी हा सामना पाहिला. पवार यांनी ट्विट करून याबाबतची माहिती दिली.



ट्विटमध्ये काय ?


गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र भाई पटेल, बीसीसीआयचे सचिव जय शहा आणि खजिनदार आशिष शेलार यांच्यासमवेत अहमदाबादमध्ये भारत-न्यूझीलंड मॅच बघण्याचा आज योग आला. यावेळी भारताच्या विजयाने आणि स्टार फलंदाज शुबमन गिलच्या शानदार सेंच्यूरीने मॅचची रंगत अधिकच वाढली, असे ट्विट रोहित पवार (Rohit Pawar) यांनी केले होते. तसेच रोहित पवार यांनी या सामन्या दरम्यान क्रिकेटचा देव मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर यांचीही भेट घेतली. तसेच क्रिकेट आणि क्रिकेट संबंधित अनेक विषयावर चर्चा देखील केली. या संबंधित ट्विट देखील त्यांनी केले आहे. 



दरम्यान नुकतीच रोहित पवार (Rohit Pawar)  यांची महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशनच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. पुण्यातील गहूंजे स्टेडियमवर पार पडलेल्या कमिटीच्या बैठकीत त्यांची निवड करण्यात आली होती. त्यामुळे या निवडीनंतर ते आता क्रिकेटच्या मैदानात प्रथमच दिसले आहे. त्याच्या या फोटोची क्रिकेट वर्तुळात चर्चा आहे.