मुंबई : टोकियो ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्राने पाकिस्तानच्या अर्शद नदीमने अंतिम फेरीच्या पहिल्या फेरीपूर्वी आपल्या भाल्याशी छेडछाड केल्याचा दावा फेटाळला आहे.
नीरजने लोकांना केली ही विनंती


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नीरजने एका मुलाखतीत सांगितले होते की, त्याला पहिला थ्रो करण्यापूर्वी नदीमकडून भाला घ्यावा लागला होता, तो पुढे म्हणाले की भाला वाद वाढवण्याचा एक मार्ग म्हणून त्याच्यावर कमेंट करणे, किंवा चर्चा करणे चुकीचे आहे, त्याचा चुकीचा वापर करू नका.


नीरज म्हणाला, 'मी सर्वांना विनंती करतो की कृपया माझा आणि माझ्या टिप्पण्यांचा वापर तुमच्या स्वार्थासाठी आणि प्रसिद्धीचे माध्यम म्हणून करू नका. खेळ आपल्याला एकत्र राहण्यास आणि एक होण्यास शिकवतात. माझ्या अलीकडील कमेंटवर काही सार्वजनिक प्रतिक्रिया पाहून मी अत्यंत निराश झालो आहे.



पाक खेळाडूचा भाला घेणे ही मोठी गोष्ट नाही-नीरज


व्हिडिओमध्ये, 23 वर्षीय नीरजने स्पष्ट केले की, भाला फेकणारा कोणाचाही भाला वापरू शकतो आणि यासाठी कोणताही विशिष्ट नियम नाही.