Neeraj Chopra Ranked : भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने (Neeraj Chopra Ranked) जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान मिळवून इतिहास रचला आहे. जागतिक ऍथलेटिक्सने जाहीर केलेल्या क्रमवारीत, नीरज चोप्रा पुरुषांच्या भालाफेकीत प्रथम क्रमांकाचा खेळाडू ठरला. ऑलिम्पिक चॅम्पियन नीरज चोप्रा हा जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान पटकावणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला. जागतिक अॅथलेटिक्सने जारी केलेल्या क्रमवारीत नीरज 1455 गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. त्याने ग्रॅनडाचा विश्वविजेता अँडरसन पीटर्सला 22 गुणांनी मागे टाकले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नीरज चोप्रा (Neeraj Chopra) 2021 च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये प्रथमच ट्रॅक आणि फील्ड स्पर्धेत सुवर्णपदक जिंकण्याचा पराक्रमा केला होता. स्टार भारतीय भालाफेकपटू अँडरसन पीटर्सला मागे टाकून पहिल्या क्रमांक पटकवला आहे. ताज्या क्रमवारीनुसार, नीरज चोप्राचे 1455 गुण आहेत आणि अँडरसन पीटर्सचे 1433 गुण आहेत. नीरजाकडे 22 गुणांची आघाडी आहे.  त्याच वेळी, जेकब वडलेज 1416 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. 



7 ऑगस्ट 2021 रोजी नीरज चोप्राने टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी भालाफेकमध्ये सुवर्णपदक जिंकण्याचा करिष्मा केला होता. ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारा तो पहिला ट्रॅक आणि फील्ड अॅथलीट ठरला. इतकेच नाही तर भारतासाठी सुवर्णपदक जिंकणारा तो दुसरा वैयक्तिक खेळाडू ठरला. 25 वर्षांचा नीरजने तिथूनच हेडलाईन्स बनवायला सुरुवात केली. स्टॉकहोम येथे झालेल्या डायमंड लीगमध्ये नीरजच्या 89.94 मीटर फेकण्याचा विक्रमही नोंदवला गेला आहे. 


ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकल्यानंतर नीरज चोप्राने झुरिच येथे झालेल्या डायमंड लीगमध्ये 89.63 मीटर फेक करून सुवर्णपदक जिंकले. नीरज चोप्रा 4 जून रोजी हॉन्गेलो, नेदरलँड येथे होणाऱ्या फॅनी ब्लँकर्स-कोएन गेम्समध्ये सहभागी होणार आहे. यानंतर, 13 जून रोजी, रोझी फिनलंडमधील तुर्कू येथे नूरमी गेम्सचा भाग असेल. विशेष म्हणजे भालाफेकीत सुवर्णपदक जिंकणारा नीरज चोप्रा हा पहिला भारतीय खेळाडू ठरला. तेव्हापासून त्याची चमकदार कामगिरी मनोरंजक आहे. आगामी सामन्यात त्याची कामगिरी पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.


फ्रान्समधील कामगिरी कायम ठेवण्याची इच्छा


भारतीय भालाफेकपटू निरज हा आशियाई क्रीडा स्पर्धेचा गतविजेता आहे. इंडोनेशियातील जकार्ता येथे झालेल्या 2018 आशियाई क्रीडा स्पर्धेत त्याने सुवर्णपदक जिंकले. यावर्षी 23 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर या कालावधीत चीनमधील हांगझोऊ येथे होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेत त्याला आपले विजयी स्थान कायम राखायचे आहे. गेल्या वर्षी अमेरिकेत झालेल्या यूजीन वर्ल्ड अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये नीरजनने रौप्य पदक जिंकले असते.