Neeraj Chopra Injured Before Diamond League Final : भारतचा स्टार भालाफेकपटू नीरज चोपडा याने शनिवार 14 सप्टेंबर रोजी डायमंड लीगच्या फायनल राउंडमध्ये 87.86 मीटर भालाफेक करून सलग दुसऱ्यांदा दुसरे स्थान पटकावले. यावेळी डाव्या हाताला दुखापत झालेली असून सुद्धा नीरज या स्पर्धेत उतरला होता. तरीही त्याने जबरदस्त प्रदर्शन केले परंतु त्याला पहिला क्रमांक केवळ 1 सेंटीमीटरच्या फरकाने गमवावा लागला त्यामुळे तो डायमंड ट्रॉफी जिंकू शकला नाही. नीरजने स्पर्धेंनंतर सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून स्वतः याबाबतचा खुलासा केला. 


नीरजचं स्वप्न अपूर्णच राहिलं : 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नीरज चोप्राने तिसऱ्या प्रयत्नात सर्वोत्तम थ्रो केला पण तो विजेत्या अँडरसन पीटर्सच्या 87.87 मीटरपेक्षा एक सेंटीमीटर मागे पडला. दोन वेळचा विश्वविजेता ग्रेनेडाच्या अँडरसन पीटर्सने पहिल्याच प्रयत्नात सर्वोत्तम थ्रो केला. जर्मनीच्या ज्युलियन वेबरने 85.97 मीटर फेक करून तिसरे स्थान पटकावले. टोकियो ऑलिम्पिक चॅम्पियन नीरज चोप्राने गेल्या महिन्यात पॅरिस ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकले होते. नीरज 2022 मध्ये डायमंड लीग जिंकलेला आहे. मात्र आता सलग दुसऱ्यांदा त्याचे डायमंड लीग टायटल जिंकण्याचे स्वप्न भंगले. 


हेही वाचा : 'त्यापेक्षा तू आत्महत्या कर..' गोल्डन बॉय नवदीपची कहाणी ऐकून डोळ्यात येईल पाणी!



 


नीरजने मोडलेल्या हाताबाबत केला खुलासा : 


नीरजने डायमंड लीगमध्ये दुसरे स्थान पटकावल्यावर सोशल मीडिया पोस्ट करून लिहिले की, "2024 हे वर्ष आता समाप्त होत असताना, मी त्या सर्व गोष्टींना आठवतोय ज्या मी वर्षभरात शिकल्या ज्यात सुधारणा, अपयश, मानसिकता आणि अजून खूप गोष्टी आहेत. सोमवार 9 सप्टेंबर रोजी प्रॅक्टिस दरम्यान माझ्या डाव्या हाताला दुखापत झाली. जेव्हा एक्सरे काढला तेव्हा समजले की माझ्या डाव्या हाताच्या चौथ्या मेटाकार्पल हाडात फ्रॅक्चर आहे. हे आणखी एक वेदनादायक आव्हान होते, पण माझ्या टीमच्या मदतीने मी डायमंड लीग फायनल्समध्ये भाग घेऊ शकलो. ही वर्षातील शेवटची स्पर्धा होती आणि मला माझा सीजन ट्रॅकवर संपवायचा होता. मी माझ्या स्वतःच्या अपेक्षा पूर्ण करू शकलो नाही, पण मला असे वाटते की हा एक सीजन होता ज्यामध्ये मी खूप काही शिकलो. मी आता परतण्यासाठी, पूर्णपणे तंदुरुस्त होण्याच्या तयारीसाठी जात आहे. तुमच्या प्रोत्साहनाबद्दल मी तुम्हा सर्वांचे आभार मानू इच्छितो. 2024 ने मला एक चांगला खेळाडू आणि व्यक्ती बनवले आहे. 2025 मध्ये भेटू".