मुंबई : टोकिया ऑलिम्पिकमध्ये भालाफेकीत सुवर्णपदक जिंकणाऱ्या नीरज चोप्राने भारतीय क्रीडा क्षेत्रात इतिहास घडवला. तब्बल 13 वर्षांनी नीरज चोप्राने भारताला वैयक्तिक सुवर्णपदक मिळवून दिलं आहे. ऑलिम्पिकमध्ये सुवर्णकामगिरी करणाऱ्या नीरज चोप्राचं आज दिल्ली विमानतळावरही जंगी स्वागत झालं. देशभरात नीरज चोप्राच्या कामगिरीचं कौतुक होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नीरजच्या कामगिरीचा प्रत्येक भारतीयाला अभिमान असून गुजरातमधल्या एका पेट्रोलपंप मालकाने आपला आनंद अनोख्या पद्धतीने साजरा केला आहे. गुजरातमधल्या भरुच इथं एका पेट्रोलपंपवर नीरज नावाच्या वक्तींना मोफत पेट्रोल दिलं जात आहे. आपल्या पेट्रोलपंपवर या मालकाने तसा बोर्डच लावला आहे. नीरज असलेल्या व्यक्तींना ओळखपत्र दाखवून 501 रुपयांचं पेट्रोल मोफत दिलं जात आहे.


इतकंच नाही तर पेट्रोल भरण्यासाठी येणाऱ्या नीरज नावच्या वक्तींचं स्वागत करण्यात यावं असे आदेशही पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना  देण्यात आले आहेत.



मोफत रोप वे सेवा


नीरज असलेल्या व्यक्तींसाठी जुनागढमध्येही अशीच एक ऑफर ठवेण्यात आली आहे. नीरज नावाच्या व्यक्तींना गिरनार रोप-वेची मोफत सेवा दिली जाणार आहे. ही ऑफर 20 ऑगस्टपर्यंत असणार आहे. गिरनार रोप वे हा देशातील सर्वाधिक लांबीचा रोप वे आहे. याचं तिकिट 400 ते  700 रुपये इतकं आहे. गिरनार पर्वत चढण्यासाठी 9 हजार 999 पायऱ्या चढाव्या लागतात. किंवा रोप वेमुळे काही सेकंदात तुम्हाला गिरनार पर्वतावरील अंबा माता मंदिरात पोहचता येतं. 


मोफत कटिंग आणि शेविंग


भरुचच्याच अंकलेश्वरमध्ये एका सलून चालकाने नीरज नावाच्या लोकांसाठी मोफत कटिंग आणि शेविंग करण्याची घोषणा केली आहे. यानंतर
नीरज नावाच्या लोकांची त्याच्या सलूनमध्ये शेविंग आणि कटिंग करण्यासाठी एकच गर्दी झाली होती.