तू खूप चांगला...; या खेळाडूच्या कामगिरीवर मालकीण नीता अंबानी खूश
टीमच्या या नव्या खेळाडूवर नीता अंबानी फार खूश आहेत.
मुंबई : यंदाच्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सच्या टीमने त्यांचं खातं उघडलं आहे. मुंबईने राजस्थान रॉयल्सविरूद्ध पहिला विजय मिळवत 2 पॉईंट्स कमावलेत. मुंबईच्या पहिल्या विजयानंतर चाहते फार आनंदी आहेत. दरम्यान मुंबईच्या पहिल्या विजयावर मालकीण नीता अंबानी देखील फार खूश आहेत.
मुंबईच्या पहिल्या विजयाचा हिरो कुमार कार्तिकेय ठरला. त्याने राजस्थान विरूद्धच्या सामन्यात 4 ओव्हर्समध्ये केवळ 1 रन्स दिले. यावेळी त्याने महत्त्वाच्या क्षणी समोरच्या टीमला रन्स काढू दिले नाहीत.
टीमच्या या नव्या खेळाडूवर नीता अंबानी फार खूश आहेत. अंबानी यांनी कार्तिकेयसाठी खास मेसेजही दिला. टीम जिंकल्यानंतर नीता अंबानी आणि आकाश अंबानी यांनी टीमला संबोधित केलंय. यावेळी त्यांनी कार्तिकेयचं कौतुकंही केलं.
कार्तिकेयशी बोलताना नीता अंबानी म्हणाला, तू खूप चांगला खेळलास, अभिनंदन. तु नेहमी असंच छान खेळत राहशील. यानंतर कार्तिकेयने ही टीमने पाठिंबा दिल्याबद्दल त्यांना धन्यवाद दिले.
24 वर्षांच्या कुमार कार्तिकेयला मुंबई इंडियन्सने 20 लाखांमध्ये आपल्या टीममध्ये घेतलं. त्याला टीमचाही चांगला सपोर्ट आहे. यूपीच्या सुलतानपुरमधून आलेल्या या खेळाडूने पहिल्याच सामन्यात सर्वांना प्रवाभित केलं.