IPL 2023: ना विराट ना सूर्या, हरभजन म्हणतो `हा` खेळाडू खरा टी-ट्वेंटी स्पेशलिस्ट!
Harbhajan singh, IPL 2023: हरभजन सिंह (Harbhajan singh) याला सर्वात खतरनाक टी-ट्वेंटी प्लेयर कोण? असा सवाल विचारला होता. त्यावर आपलं मत रोखठोक मांडलं. हरभजन सिंगच्या दृष्टीनं इंग्लिश फलंदाज जॉस बटलर (Jos Buttler) हा जगातील सर्वोत्तम टी-20 फलंदाज आहे.
Harbhajan singh On Jos Buttler: सध्या टी-ट्वेंटी क्रिकेटचा कुंभमेळावा म्हणजे आयपीएलला दणक्यात सुरूवात झाली आहे. राजस्थान रॉयल्सचा (Rajasthan Royals) संघ 6 पैकी 4 सामने जिंकून पाईंट टेबलच्या (IPL Point Table) अव्वल स्थानी विराजमान आहे. राजस्थानच्या या वाटचालीच्या पाठीमागे पराक्रम दडलाय तो, जॉस बटलर (Jos Buttler) याचा... आपल्या वादळी खेळीमुळे जॉस सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आलाय. अशातच आता टीम इंडियाचा माजी फिरकीपटू भज्जी उर्फ हरभजन सिंह (Harbhajan singh) याने बटलरचं तोंडभरून कौतूक केलंय.
कधी काळी आपल्या फिरकीच्या जादूवर भल्या भल्या फलंदाजांना नाचवणारा हरभजन सिंग सध्या आयपीएलमध्ये (IPL 2023) समालोचकाची जबाबदारी पार पाडतोय. त्यामुळे त्याचे वक्तव्य सध्या चर्चेत असतात. अशातच आता हरभजन सिंह याला सर्वात खतरनाक टी-ट्वेंटी प्लेयर कोण? असा सवाल विचारला होता. त्यावर आपलं मत रोखठोक मांडलं. त्यावेळी त्याने विराटचं (Virat kohli) नाव घेतलं, ना सूर्याचं (suryakumar yadav)...
काय म्हणाला हरभजन सिंह?
हरभजन सिंगच्या दृष्टीनं इंग्लिश फलंदाज जॉस बटलर (Harbhajan singh On Jos Buttler) हा जगातील सर्वोत्तम टी-20 फलंदाज आहे. जॉस बटलरकडे जबरदस्त तंत्र आहे, त्याचं कौतुक करण्यासाठी माझ्याकडे शब्द कमी आहेत, असं म्हणत त्याने बटलरवर कौतूकाचा वर्षाव केलाय. बटलर क्रीजचा पुरेपूर वापर करतो. तो पूर्ण फलंदाजाच्या श्रेणीत येतो. माझ्यासाठी तो जगातील नंबर 1 फलंदाज आहे. त्यांच्याकडे फूटवर्कची कमतरता नाही, असंही भज्जी म्हणतो.
आणखी वाचा - Live सामन्यात Virat Kohli ने केली शिवीगाळ? पाहा Video
राजस्थानच्या प्रत्येक सामन्यात जॉस द बॉसचा रांगडा खेळ सुरू आहे. चेन्नईविरुद्ध बटलरने 36 चेंडूत 52 धावांची आक्रमक खेळी केली. त्यावेळी त्याने 3 गगनचुंबी षटकार देखील खेचलेत. त्यावेळी त्याने आयपीएल करियरमधील 3000 धावा पूर्ण केल्या. आयपीएलमध्ये सर्वात जलध 3000 धावा करणारा तो खेळाडू ठरलाय.
Jos Buttler ला पाहताच पोरीचं मन हुरहुरलं, डोळ्यात पाणी अन् थेट म्हणाली 'I Love You'... पाहा Video
दरम्यान, आयपीएलमध्ये सध्या इंग्लंडच्या खेळाडूंची जादू दिसत असल्याचं पहायला मिळतंय. एकीकडे बटलरचं वादळ मैदानात घोगळतंय, तर दुसरीकडे मार्क वूड (Mark Wood) आपल्या गोलंदाजीची किमया दाखवतोय. बटलरने मागील हंगामात राजस्थानला फायनलचं तिकीट मिळवून दिलं होतं. मात्र, गुजरातकडून त्यांना पराभव स्विकारावा लागला होता. आता यंदा बटलर पुन्हा राजस्थानसाठी संकटमोचक ठरणार का? असा सवाल आता उपस्थित होताना दिसतोय.