दुबई : क्रिकेट विश्वात दररोज नवनवीन विक्रम होत असतात. तर अनेक विक्रम दररोज मोडीत निघतात. क्रिकेटमध्ये येणाऱ्या प्रत्येक खेळाडूला सचिन तेंडूलकरच्या एकातरी विक्रमाची बरोबरी करावी किंवा तो विक्रम मोडीत काढत नवा विक्रम करावा, असे स्वप्न असते. असाच एक सचिनचा विक्रम नेपाळच्या खेळाडूने मोडला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 



नेपाळ संघाच्या रोहित पाउडेलने हा विक्रम केला आहे. रोहित पाउडेलने, संयुक्त अरब अमिराती (यूएई) या संघाविरुद्धात खेळताना ५५ धावांची खेळी केली. या वेळी त्याचे वय हे १६ वर्ष १४६ दिवस इतके होते. या आधी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात कमी वयात अर्धशतकी खेळी करण्याचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावे होता. सचिनने त्याचे वय १६ वर्ष २१३ दिवस इतके असताना पाकिस्तानविरुद्ध फैसलाबाद येथे झालेल्या सामन्यादरम्यान ५९ धावांची खेळी केली होती. रोहितने सचिनचा विक्रम मोडीत काढतानाच, शाहिद अफ्रिदीच्या विक्रमदेखील मोडला आहे. शाहिद अफ्रिदीने १६ वर्ष २१७ दिवस इतके वय असताना अर्धशतकी कामगिरी केली होती.


सातव्या स्थानावर खेळण्यासाठी उतरलेल्या रोहितने ५८ चेंडूत ५५ धावा केल्या. यावेळी त्याने ७ चौकार ठोकले. रोहितच्या या खेळीमुळे नेपाळने ५० षटकात ९ गडी बाद २४२ धावा केल्या.नेपाळने दिलेले आव्हान पेलण्यासाठी उतरलेल्या यूएईचा संघ ९७ धावांवर बाद झाला. नेपाळने हा सामना १४५ धावांनी जिंकला. तीन सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघाने १-१ बरोबरी साधली आहे. पहिला सामना यूएईने जिंकला होता. 


विजयी २४२ धावांचे पाठलाग करायला आलेल्या यूएईचा संपूर्ण संघ अवघ्या 97 धावांवर गारद झाला. यामुळे नेपाळचा १४५ धावांनी विजय झाला. या विजयासोबतच ३ सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघानी १-१ अशी बरोबरी केली आहे. यामुळे तिसरा सामना हा चुरशीचा होणार आहे.