हरारे : नेपाळ या देशाला इतिहासात पहिल्यांदाच वनडे टीमचा दर्जा मिळाला आहे. आयसीसी वर्ल्ड कप क्वालिफायरच्या प्ले ऑफमध्ये नेपाळनं पपुआ न्यू गिनीवर विजय मिळवला. या विजयानंतर नेपाळला वनडे टीमचा दर्जा मिळाला. पण पराभवामुळे मात्र पपुआ न्यू गिनीला वनडेचा दर्जा गमवावा लागला.


नेपाळच्या क्रिकेट प्रशासनावर दोन वर्षांची बंदी घालण्यात आली होती. या बंदीनंतरही नेपाळनं वनडेचा दर्जा प्राप्त केल्यामुळे टीमचं कौतुक होत आहे. वनडेचा दर्जा मिळाल्यामुळे देशातील क्रिकेट बदलेल असा विश्वास नेपाळचा कॅप्टन पारस खाडकानं व्यक्त केला आहे.