Saurav Chauhan : सर्वत्र वर्ल्ड कप 2023 चा फिवर पहायला मिळत आहे. अशातच सैयद मुश्‍ताक अली ट्रॉफीमध्ये (टी20 क्रिकेट) गुजरातच्या क्रिकेटरने अनोख विक्रम रचला आहे. या खेळाडूने 13 बॉलमध्ये हाफ सेंचुरी केली आहे. सौरव चौहान असे या क्रिकेटरचे नाव आहे. सर्वात वेगवान अर्धशतक झळकावून सौरव याने इतिहास रचला आहे.


अहमदाबादच्या एएमसी स्टेडियमच्या ग्राउंड्समनचा मुलगा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सौरव चौहान हा अहमदाबादच्या एएमसी स्टेडियमच्या ग्राउंड्समनचा मुलगा आहे. सौरव हा 23 वर्षांचा आहे.  सौरवने 18 बॉलमध्ये 5 चौकार आणि सहा षटकारांसह 61 धावांची दमदार खेळी केली आहे.  अरुणाचल संघासोबतच्या सामन्यात गुजरातच्या सौरवने रेकॉर्ड ब्रेक कामगिरी केली. सौरवने मेघालयच्या अभय नेगीचा विक्रम मोडला आहे. अभय नेगी याने 2019 साली मिझोरामविरुद्धच्या सामन्यात 14 चेंडूत अर्धशतक ठोकले होते. सौरवने आपल्या दमदार फलंदाजीने अभय नेगीचा विक्रम मोडला आहे.  क्रिकेटमधील सर्वोत्तम फलंदाजांमध्ये सौरवचे नाव सामील झाले आहे. सौरव हा डावखुरा फलंदाज आहे.  T20 च्या 12 सामन्यांमध्ये त्याने 146.52 च्या स्ट्राईक रेटने आणि 27146.5240 च्या सरासरीने 274 धावा केल्या आहेत. यामध्ये तीन अर्धशतकांचा समावेश आहे.


8 ओव्हरमध्ये गुजरात संघाने पूर्ण केले टार्गेट 


सैयद मुश्‍ताक अली ट्रॉफीतील  गुजरात आणि अरुणाचल संघातील सामना अतिशय चुरशीचा झाला.  गुजरात संघाने अरुणाचल संघाने विजयासाठी  रचलेला धावसंख्येचा डोंगर अवघ्या 8 ओव्हरमध्ये सर केला. गुजरात संघाचे दोन्ही सलामीवीर बाद झाल्यानंतर सौरवने क्रीज घेतली. 18 बॉलमध्ये 5 चौकार आणि सहा षटकारांसह 61 धावा काढत सौरवने गुजरात संघाला विजय मिळवून दिला. 


अरुणाचल संघाची फिल्डींग फसली


गुजरात संघाच्या दमदार बॅटिंग समोर अरुणाचल संघाची फिल्डींग अपुरी पडली.  अरुणाचल संघाचे मायांगडांग सिंगपो आणि आर्यन साहनी हे  दोन गोलंदाज यांनी शेवटी सौरवला बाद केले. दोघांच्या बॉलिंग दरम्यान सौरव याने 26 आणि 23 धावा काढल्या. 13 बॉलमध्ये 61 धाव्या काढल्यानंतर सातव्या ओव्हरला सौरव बाद झाला.


अरुणाचल संघाने गुजरातला दिले होते 126 धावांचे टार्गेट


अरुणाचल संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.  20 ओव्हरमध्ये 8 विकेट गमावत 126 धावांचे टार्गेट अरुणाचल संघाने गुजरातला दिले होते. गुजरात संघाकडून रवी बिष्णई, अर्जन नागासवाला आणि चिंतन गजा यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.