T20 World Cup 2024: सध्या आयपीएल सुरु आहे आणि आयपीएलनंतर आयसीसी टी- 20 वर्ल्डकपला सुरुवात होणार आहे. 2 जून रोजी वर्ल्डकपचा पहिला सामना खेळवला जाणार असून 5 तारखेला टीम इंडियासाठी या स्पर्धेची सुरुवात होणार आहे. दरम्यान या स्पर्धेतील दुसरा सेमीफायनलचा सामना 27 जून रोजी खेळवण्यात येणार आहे. अशातच आता सेमीफायनल आणि फायनलच्या सामन्यात पावसाने हजेरी लावली तर काय असा प्रश्न सर्व चाहत्यांच्या मनात आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

2 जूनपासून T20 वर्ल्डकप 2024 चं आयोजन करण्यात येणार आहे. या स्पर्धेतील पहिली सेमीफायनल 26 जून रोजी होणार आहे. तर0 दुसरी सेमीफायनल 27 जून रोजी गयानामध्ये होणार आहे. क्रिकबझने दिलेल्या माहितीनुसार, दुसऱ्या सेमीफायनलसाछी कोणताही रिझर्व्ह डे दिवस ठेवण्यात आलेला नाही. मात्र असं झाल्यास सामना काहीसा उशीरा सुरु करण्यात येईल. यावेळी जर हा सामना पावसामुळे थांबला तर 250 मिनिटांनी म्हणजे सुमारे 4 तास वाढवून देण्यात येणार आहे. यासोबतच इतर नवीन नियमही करण्यात आले आहेत.


जर पावसामुळे सामना रद्द झाला तर कोणत्या टीमला होणार फायदा?


जर वर्ल्डकपमधील दुसऱ्या सेमीफायनलच्या सामन्यात पावसामुळे व्यत्यत आला तर पॉईंट्स टेबलमध्ये अव्वल असलेल्या टीमला त्याचा फायदा होणार आहे. यामध्ये सुपर 8 मध्ये अव्वल स्थान मिळवणाऱ्या टीमला अंतिम फेरीत प्रवेश मिळणार आहे. जर सामना अजिबात खेळवण्याची स्थिती निर्माण झाली तरच तो रद्द होईल. याबाबत अंतिम निर्णय अंपायर घेणार आहेत. गयानाची खेळाची परिस्थिती लक्षात घेऊनच निर्णय घेतला जाईल. दुसरी सेमीफायनल 27 जून रोजी भारतीय वेळेनुसार रात्री 8.30 वाजता सुरू होणार आहे.


पहिल्या सेमीफायनलसाठी होणार रिझर्व्ह डे


T20 वर्ल्डकप 2024 चा पहिली सेमीफायनल 26 जून रोजी वेस्ट इंडिजच्या त्रिनिनाद मध्ये खेळवली जाणार आहे. भारतीय वेळेनुसार सकाळी 6 वाजल्यापासून हा सामना खेळवला जाणार आहे. या सामन्यासाठी रिझर्व्ह ठेवण्यात आलाय. पावसामुळे हा सामना रद्द झाला, तर हा सामना पुन्हा 27 जून रोजी खेळवला जाऊ शकतो. या स्पर्धेचा अंतिम सामना बार्बाडोसमध्ये 29 जून रोजी होणार आहे.


टी20 वर्ल्ड कप स्क्वॉड 2024 - 


रोहित शर्मा (C), हार्दिक पंड्या (VC), यशस्वी जायसवाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (W), संजू सैमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंह, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.


रिझर्व खेळाडू - शुभमन गिल, रिंकू सिंह, खलील अहमद, आवेश खान.


5 जूनपासून टीम इंडियाचे सामने


टी20 वर्ल्ड कपमध्ये 5 जूनपासून टीम इंडियाच्या प्रवासाला सुरुवात होणार आहे. टीम इंडियाचा पहिला सामना आयर्लंडविरुद्ध रंगणार आहे. तर 9 जूनला टीम इंडिया पारंपारिक प्रतिस्पर्धी पारिस्तानशी दोन हात करणार आहे.  यानंतर 12 जूनला अमेरिका आणि 15 जूनला कॅनडाविरुद्ध सामना रंगणार आहे. टी20 वर्ल्ड कपमध्ये 19 जूनपासून सुपर 8 चे सामने रंगतील. तर 29 जूनला अंतिम सामना खेळवला जाईल.