साऊथेम्पटन - केन विल्यमसनच्या नेतृत्वाखाली खेळणारा न्यूझीलंड संघ टेस्ट क्रिकटची चॅम्पियन ठरला आहे. कर्णधार केन विल्यमसन आणि रॉस टेलरच्या झुंजार फलंदाजीच्या जोरावर न्यूझीलंडने भारतावर 8 विकेट राखून मात केली आणि टेस्ट चॅम्पियन होण्याचा मान पटकावला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारताचा दुसरा डाव 170 धावांवर आटोपला आणि न्यूझीलंडसमोर विजयासाठी 139 धावांचं आव्हान ठेवलं. टॉम लेथम आणि डेवोनो कॉनवे ही न्यूझीलंडची सलामीची जोडी स्वस्तात बाद झाली. आर अश्विनने दोघांनाही पॅव्हेलिअनचा रस्ता दाखवला. पण त्यानंतर अनुभवी रॉस टेलर आणि कर्णधार केन विल्यमसनने संयमी फलंदाजी करत न्यूझीलंडच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.


न्यूझीलंड टीम मालामाल


वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या विजेत्या न्यूझीलंड संघाला बक्षीस रक्कम म्हणून 1.6 लाख अमेरिकन डॉलर्स म्हणजे भारतीय चलनात ही रक्कम 11.72 कोटी मिळणार आहेत. शिवाय न्यूझीलंड संघाने चॅम्पियनशिपची गदाही पटकावली आहे. तर उपविजेत्या भारतीय संघाला 5.85 कोटी रुपये मिळणार आहेत.