`या` क्रिकेटरने मॅच दरम्यान केला अपशब्दांचा वापर, ठोठावला ९०० डॉलरचा दंड
क्रिकेटच्या मैदानात अंपायरकडून अनेकदा चूका झाल्याचं समोर आलं आहे. तसेच या चुकांमुळे अनेकदा मॅचचा निर्णयही बदलल्याचं समोर आलं आहे.ॉ
नवी दिल्ली : क्रिकेटच्या मैदानात अंपायरकडून अनेकदा चूका झाल्याचं समोर आलं आहे. तसेच या चुकांमुळे अनेकदा मॅचचा निर्णयही बदलल्याचं समोर आलं आहे.ॉ
(व्हिडिओ पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा)
अंपायरच्या चुकीमुळे अनेकदा क्रिकेटर्स अंपायरवर भडकतात. अशाच प्रकारे एका क्रिकेटरला अंपायरवर भडकणं चांगलचं महागात पडलं आहे.
न्यूझीलंडमध्ये सुरु असलेल्या सुपर स्मॅश टी-२० टूर्नामेंटमध्ये हा प्रकार घडला आहे. नॉर्थन नाईट्स आणि वेलिंगटन फारबर्ड्स यांच्यात हेमिलटनमध्ये मॅच सुरु होती. त्यावेळी न्यूझीलंडचा ऑल राऊंडर एंटन देवसीच हा अंपायरच्या निर्णयावर चांगलाच भडकला आणि त्याप्रकरणी देवसीचवर दंड ठोठावण्यात आला आहे.
एंटन देवसीच मॅच दरम्यान मिड ऑनवर बाऊंड्रीजवळ फिल्डिंग करत होता. त्याचवेळी समित पटेलने मारलेला बॉल सिक्सर जाताना एंटनने अडवला आणि मैदानात फेकला.
यावेळी सिक्सर गेला की नाही हे विचारण्यासाठी अंपायर बिली बाऊडेन हे थर्ड अंपायरची मदत घेतात. थर्ड अंपायर रिल्पे पाहून सिक्सर गेल्याचं घोषित करतात.
अंपायरने दिलेल्या या निर्णयामुळे एंटन देवसीच चांगलाच संतापतो आणि तो चक्क शिवी देताना पहायला मिळाला. याघटनेपूर्वी देवसीच लाईव्ह माईक कमेंटेटर्ससोबत लाईव्ह चर्चा करत होता. त्यामुळे त्याच्याकडे माईकही होता. त्यामुळे देवसीचने दिलेली शिवी स्पष्ट ऐकायला आहे.
मॅचनंतर रेफरीने देवसीचला लेवल १.२.१ नुसार दोषी असल्याचं सांगत ९०० डॉलर्स जवळपास ५७६१६ रुपयांचा दंड ठोठावला आहे.