New Zealand vs England 1st Test: न्यूझीलंड आणि इंग्लंडदरम्यान (Nz vs Eng Test Match) सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यामध्ये इंग्लंडचा माजी कर्णधार जो रुट (Joe Root) अगदीच विचित्र पद्धतीने बाद झाला आहे. रुट हा स्लिपमध्ये झेलबाद झाला. सोशल मीडियावर रुटच्या बाद होण्याची हटके स्टाइल चर्चेचा विषय ठरत आहे. ज्या पद्धतीने रुट बाद झाला आहे ते पाहून त्यालाही नक्कीच आपलं नशीबच खराब असं वाटलं असणार. 


रुट त्याच्या फटकेबाजीसाठी प्रसिद्ध


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रुट मागील काही काळापासून आपल्या आगळ्या वेगळ्या बॅटींगच्या शैलीमुळे चाहत्यांची मनं जिंकताना दिसत आहे. मात्र या सामन्यात रिव्हर्सला फटका मारणं त्याला फारच भारी पडलं. एका सोप्या चेंडूवर नको ती कसरत करायला गेलेल्या रुटला तंबूत परतावं लागलं. इंग्लंडच्या पहिल्या डावात या एका खराब शॉटमुळे तंबूत परताव्या लागलेल्या रुटला केवळ 14 धावा करता आल्या. बाद झाल्यानंतर रुटच्या चेहऱ्यावरील निराशाच हा शॉट खेळून त्याला किती पश्चाताप झाला हे दाखवत होती. 


नेमकं घडलं काय?


झालं असं की, डेरिल मिशेलच्या गोलंदाजीवर रुटने रिव्हर्स शॉट मारण्याचा प्रयत्न करत होता. मात्र रुटला त्याच्या नशिबाने फारशी साथ दिली नाही. चेंडू रुटच्या बॅटला लागला मात्र तो मध्यभागी न लागता बॅटच्या अगदी तळाशी लागला अन् स्लिपमध्ये उभ्या असलेल्या खेळाडूच्या दिशेने गेला. स्लिपमध्ये नील वँगरने हा सोपा झेल सहज टीपला. जो रुट सारखा खेळाडू एवढ्या सोप्या चेंडूवर बाद झाल्यामुळे चाहत्यांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे.



पहिल्या दिवशी इंग्लंडकडून इनिंग डिक्लियर


या कसोटी सामन्याबद्दल सांगायचं झाल्यास टॉस जिंकून न्यूझीलंडने इंग्लंडला प्रथम फलंदाजीचं आमंत्रण दिलं. इंग्लडकडून बेन डकेटने 84 धावांची सुंदर खेळी केली तर हॅरी ब्रूकने पुन्हा एकदा छान खेळी करत 89 धावा केल्या. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा इंग्लंड 288 धावांनी आघाडीवर आहे. इंग्लंडने अवघ्या 58.2 षटकांच्या खेळानंतर 325 धावांवर असताना पहिला डाव घोषित केला. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या न्यूझीलंडची अडखळती सुरुवात झाली असून त्यांना पहिल्या दिवसाच्या उर्वरित 18 षटकांमध्ये 37 धावांपर्यंत मजल मारता आली. मात्र या मोबदल्यात त्यांचे 3 गडी तंबूत परतले आहेत.