हॅमिल्टन : न्यूझीलंडने (New Zealand) तिसऱ्या वनडे मॅचमध्ये नेदरलँडवर (Netherlands) 115 धावांनी दणदणीत विजय मिळवला. न्यूझीलंडने त्यांचा अनुभवी दिग्गज फलंदाज रॉस टेलरला (Ross Taylor) विजयी निरोप दिला. रॉस टेलरचा हा त्याच्या क्रिकेट कारकिर्दीतील शेवटचा सामना होता. या शेवटच्या सामन्यात रॉस टेलर अतिशय भावूक झालेला. रॉस टेलरला सामन्याच्या सुरुवातीला राष्ट्रगीतादरम्यान अश्रू अनावर झाले. रॉसला स्वत:ला रोखता आलं नाही. (new zealand vs netherland 3rd odi ross taylor emotional during national anthem)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नक्की काय झालं? 


राष्ट्रगीतावेळेस रॉस आपल्या मुलांसोबत उपस्थित होता. नेदरलँड विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेनंतर निवृत्ती घेणार असल्याचं टेलरने आधीच जाहीर केलं होतं.


तसेच रॉसने आपल्या कसोटी कारकिर्दीतील अखेरचा सामना हा बांगलादेश विरुद्ध खेळला.


शेवटच्या सामन्यात 14 धावांची खेळी


रॉसला त्याच्या सहकाऱ्यांनी विजयी निरोप दिला. मात्र या शेवटच्या सामन्यात 14 धावांची खेळी केली. 


रॉसची क्रिकेट कारकिर्द


रॉसने आपल्या एकदिवसीय कारकिर्दीत 236 सामन्यात 8 हजार  607 धावा केल्या. तसेच रॉसच्या नावावर टेस्टमध्ये 7 हजार 548 धावांची नोंद आहे.  रॉस न्यूझीलंडकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे.