लागोपाठ 10 मॅच हरणारी टीम बनली वर्ल्ड चॅम्पियन, विश्वास ठेवणं अवघड पण न्यूझीलंडने केली कमाल
भारताला हरवून वर्ल्ड कपची सुरुवात करणाऱ्या न्यूझीलंड टीमने सर्वांनाच हैराण केलं. टी 20 वर्ल्ड कप सुरु होण्यापूर्वी लागोपाठ 10 सामने ठरणाऱ्या न्यूझीलंडने वर्ल्ड चॅम्पियनशिपचा खिताब पटकावून इतिहास रचला.
ICC Womens T20 World Cup 2024 : आयसीसी महिला टी 20 वर्ल्ड कपला आता नवा चॅम्पियन मिळालेला असून न्यूझीलंडने फायनलमध्ये साऊथ आफ्रिकेला धूळ चारून वर्ल्ड चॅम्पियनशिप मिळवली आहे. भारताला हरवून वर्ल्ड कपची सुरुवात करणाऱ्या न्यूझीलंड टीमने सर्वांनाच हैराण केलं. टी 20 वर्ल्ड कप सुरु होण्यापूर्वी लागोपाठ 10 सामने ठरणाऱ्या न्यूझीलंडने वर्ल्ड चॅम्पियनशिपचा खिताब पटकावून इतिहास रचला.
न्यूझीलंडच्या महिला संघाचे ते करून दाखवलं जे अजून पर्यंत त्याचा पुरुष संघ करू शकलेला नाही. पहिल्यांदा न्यूझीलंडने वर्ल्ड कपचा खिताब जिंकला आहे. न्यूझीलंडच्या संघाचा विजय यासाठी महत्वाचा आहे कारण वर्ल्ड कप सुरु होण्यापूर्वी हा संघ एक नाही दोन नाही तर तब्बल 10 वेळा पराभूत झाला. सोफी डिवाइनचाय नेतृत्वात या संघाने इतिहास रचला. अमेलिया के या टी 20 वर्ल्ड कपमध्ये सर्वात जास्त विकेट्स घेणारी गोलंदाज ठरली तर सूजी बेट्सने मिताली राजच्या सर्वात जास्त आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याचा रेकॉर्ड मोडला.
लागोपाठ 10 सामन्यात पराभूत झालेला संघ बनला चॅम्पियन :
साऊथ आफ्रिकेच्या विरुद्ध फायनल सामन्यात विजय मिळवणाऱ्या न्यूझीलंडच्या संघाने टी20 वर्ल्ड कप आपल्या नावावर केला. हा विजय यासाठी महत्वाचा आहे कारण यापूर्वी न्यूझीलंडचा टी 20 मधील 10 सामन्यात पराभव झाला होता. वर्ल्ड कपपूर्वी न्यूझीलंडच्या महिला संघाने ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडचा दौरा केला होता. यापूर्वी न्यूझीलंडला त्यांचंच घरी इंग्लंडने 4-1 ने पराभूत केलं होतं. वर्ल्ड कपला सुरुवात होण्यापूर्वी इंग्लंडने न्यूझीलंड विरुद्धची टी 20 सीरिज 5-0 ने जिंकली. तर ऑस्ट्रेलियाने तीन सामन्यांच्या सीरिजमध्ये न्यूझीलंडला क्लीन स्वीप दिले. इंग्लंड विरुद्ध लागोपाठ 7 आणि ऑस्ट्रेलिया विरुद्ध 3 सामन्यात पराभूत होऊन टी 20 वर्ल्ड कपमध्ये विजय मिळवला.