VIDEO : पिचवर ट्रॉफी ठेऊन वाजवली गिटार, संपूर्ण टीमने गायलं गाणं, न्यूझीलंडचं वर्ल्ड कप जिंकून अनोखं सेलिब्रशन

New Zealand Won Womens T20 World Cup 2024 : साऊथ आफ्रिका विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात झालेल्या फायनल सामन्यात न्यूझीलंडच्या टीमने विजय मिळवून इतिहास रचला. वर्ल्ड कप जिंकल्यावर  न्यूझीलंडच्या महिला संघाने मैदानात जबरदस्त सेलिब्रेशन केले. 

पूजा पवार | Updated: Oct 21, 2024, 01:43 PM IST
VIDEO : पिचवर ट्रॉफी ठेऊन वाजवली गिटार, संपूर्ण टीमने गायलं गाणं, न्यूझीलंडचं वर्ल्ड कप जिंकून अनोखं सेलिब्रशन
(Photo Credit : Social Media)

New Zealand Won Womens T20 World Cup 2024 : यूएईमध्ये खेळवण्यात आलेल्या आयसीसी महिला टी 20 वर्ल्ड कप 2024 चा समारोप रविवारी झाला. यात साऊथ आफ्रिका विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात झालेल्या फायनल सामन्यात न्यूझीलंडच्या टीमने विजय मिळवून इतिहास रचला. वर्ल्ड कप जिंकल्यावर  न्यूझीलंडच्या महिला संघाने मैदानात जबरदस्त सेलिब्रेशन केले. यावेळी प्लेअर ऑफ द मॅच आणि प्लेअर ऑफ द टूर्नामेंट म्हणून निवडण्यात आलेल्या ऑल राऊंडर अमेलिया केरने गिटार वाजवून गाणं गायलं आणि सर्व टीमने यात तिची साथ दिली. सध्या या अनोख्या सेलिब्रेशनचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे. 

Add Zee News as a Preferred Source

आयसीसीने शेअर केला सेलिब्रशनचा व्हिडीओ : 

आयसीसीने इंस्टाग्रामवर सेलिब्रशनचा व्हिडीओ पोस्ट केला असून यात वर्ल्ड कप जिंकल्यावर ऑल राउंडर अमेलिया केरने हातात गिटार घेऊन सुंदर गाणं म्हटलं. यावेळी न्यूझीलंडच्या महिला संघाने त्यांची वर्ल्ड कप ट्रॉफी ही पिचवर ठेवली होती. अमेलिया केरने गिटार घेऊन सुंदर गाणं म्हटलं आणि याला तिच्या टीमने देखील साथ दिली. अमेलिया केरने फायनलमध्ये 43 धावा केल्या तर 3 विकेट्स सुद्धा घेतल्या. 

हेही वाचा : कृष्णाचे भजन गात होता विराट तर टाळ्या वाजवत दंग झाली अनुष्का; मुंबईमधील कार्यक्रमाचा Video पाहाच

 

पाहा व्हिडीओ : 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by ICC (@icc)

न्यूझीलंडने विजयासाठी दिलं 159 धावांचं टार्गेट : 

न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करून 5 विकेट्स गमावू 158 धावा केल्या. मग वर्ल्ड कप जिंकण्यासाठी दक्षिण आफ्रिकेला 59 धावांचं टार्गेट दिलं. मात्र न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी यावेळी कमाल कामगिरी करून 9 विकेट्स घेऊन साऊथ आफ्रिकेच्या संघाला 126 धावांवर रोखले. दक्षिण आफ्रिकेसाठी फलंदाजी करताना कर्णधार लॉरा वूलवर्थने 27 बॉलमध्ये 33 धावांचे योगदान दिले. अमेलिया केरशिवाय रोझमेरी मेयरनेही न्यूझीलंडकडून तीन बळी घेतले. इडन कार्सन, फ्रॅन जोनास आणि हॅलिडे यांना प्रत्येकी एक विकेट घेण्यात यश आले. 

 

About the Author

Pooja Pawar

पूजा सुनील पवार या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. त्यांना मीडिया क्षेत्राचा ५ वर्षांचा अनुभव आहे. वयाच्या २० व्या वर्षी त्यांनी सकाळ वृत्तपत्रातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. तिथे सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक समस्या इत्यादी विषयांवर बातम्या आणि फिल्ड रिपोर्टिंगचा मौल्यवान अनुभव मिळाला. त्यानंतर नवभारत पासून डिजिटल पत्रकारितेला सुरुवात केली. पुढे न्यूज १८ लोकमतमधून स्पोर्ट्स सेक्शनसाठी काम केले. सध्या झी २४ तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते. याशिवाय राजकीय, क्राईम, लाईफस्टाईल या क्षेत्राशी निगडीत बातम्या देखील करते. फावल्यावेळेत सामाजिक उपक्रमांमध्ये योगदान द्यायला तसेच ट्रॅव्हल करून नवनवीन ठिकाण फिरण्याची आवड आहे.

...Read More