IPL पूर्वी नीता अंबानी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; Jhulan Goswami कडे सोपवणार मुंबई इंडियन्सची महत्त्वाची जबाबदारी
अशातच भारतीय महिला क्रिकेट पूर्व खेळाडू मिताली राज आणि झुलन गोस्वामी (Jhulan Goswami) या दोघींना मोठी जबाबदारी मिळणार आहे.
Jhulan Goswami: भारतात यंदाच्या वर्षी वूमेंस इंडियन प्रीमियर लीग (WPL 2023) मार्चमध्ये सुरु होणार आहे. ज्यासाठी बीसीसीआय (BCCI) जोरदार तयारी करतेय. यामध्ये 5 टीम्ससाठी बीसीसीआय ऑक्शन (WPL Auction) होणार आहे. त्यामुळे या महिलांच्या आयपीएलमुळे देखील बीसीसीआय आणि महिला खेळाडू मालामाल होणार आहेत. एकंदरीतच पुरुषांच्या आयपीएलप्रमाणेच महिलांचं आयपीएल मोठ्या दिमाखात होणार आहे.
अशातच भारतीय महिला क्रिकेट पूर्व खेळाडू मिताली राज आणि झुलन गोस्वामी (Jhulan Goswami) या दोघींना WPL मध्ये मोठी जबाबदारी मिळणार आहे.
भारतीय क्रिकेट प्रेमी इंडियन प्रीमियर लीग (WPL 2023) ची आतुरतेने वाट पाहतायत. कारण पुरुषांच्या आयपीएलनंतर आता महिलांची आयपीएल कशी असणार आहे, याबाबत त्यांच्या मनात उत्सुकता आहे. यंदा या लीगचा पहिला सिझन असून त्यासाठी बीसीसीआय कोणतीही कसर सोडणार नाहीये.
मिताली राज आणि Jhulan Goswami कडे मोठी जबाबदारी
भारतीय महिला क्रिकेट टीमच्या 2 खेळाडू झूलन गोस्वामी (Jhulan Goswami) आणि मिताली राज यांना वूमेंस आयपीएल फ्रेंचायझीज मोठ्या जबाबदारीची ऑफर देत आहेत.
झूलन गोस्वामीला WIPL 2023 मध्ये या टीमने दिली मोठी जबाबदारी
भारतीय महिला क्रिकेट टीमची महान गोलंदाज झूलन गोस्वामी (Jhulan Goswami) ला निवृत्ती घेतल्यानंतर WPL 2023 मध्ये मोठी भूमिकेत दिसणार आहे. एका वेबसाईटच्या रिपोर्टनुसार, झूलनला मुंबई इंडियन्सची मेंटॉर म्हणून नियुक्त केलं जाऊ शकतं.
झुलनकडे क्रिकेटचा खूप मोठा अनुभव आहे. तिच्या घातक गोलंदाजीने तिने टीम इंडियाला अनेक सामने जिंकवून दिले आहेत. इतकंच नाही तर तिचा टी-20 चा रेकॉर्ड देखील उत्तम आहे. महिला टी-20 इंटरनॅशनलमध्ये तिने 68 सामन्यांच्या 67 डावांमध्ये 56 विकेट्स पटकावले आहेत. त्यामुळे मुंबई इंडियन्सच्या टीमसाठी तिचा अनुभव फायदेशीर ठरू शकतो.
मिताली राज WPL 2023 मध्ये बनणार अहमदाबाद मेंटॉर?
झूलन गोस्वामी (Jhulan Goswami) शिवाय भारतीय महिला क्रिकेट टीमची माजी कर्णधार मिताली राजला (Mithali Raj) वुमेंस इंडियन प्रीमियर लीग (WPL 2023) मध्ये अहमदाबादच्या टीमची मेंटॉर आणि सल्लागार म्हणून नियुक्त केलं जाऊ शकतं.