दोन्ही हातांनी गोलंदाजी करणारा तामिळनाडूचा क्रिकेटर खेळणार ऑस्ट्रेलियाकडून
वयाच्या आठव्या वर्षात आपल्या गोलंदाजीने धुमाकूळ घालणारा तामिळनाडूचा क्रिकेटर निवेतन राधाकृष्णन आता ऑस्ट्रेलियाकडून अंडर 16 संघात खेळणार आहे.
नवी दिल्ली : वयाच्या आठव्या वर्षात आपल्या गोलंदाजीने धुमाकूळ घालणारा तामिळनाडूचा क्रिकेटर निवेतन राधाकृष्णन आता ऑस्ट्रेलियाकडून अंडर 16 संघात खेळणार आहे.
15 वर्षीय निवेतन राधाकृष्णनला येणाऱ्या सीझनसाठी अंडर 16 संघात सामाविष्ट करण्यात आलेय. निवेतनचे वैशिष्ट्य म्हणजे तो दोन्ही हातांनी गोलंदाजी करतो. ज्युनियर लेव्हलला तो तामिळनाडूकडून खेळलाय. माज्ञ 2013 मध्ये त्याचे आई-वडिल ऑस्ट्रेलियाला शिफ्ट झाले. त्यानंतर त्याचे नाते ऑस्ट्रेलियाशी जोडले गेले.
निवेतन सिडनीमध्ये न्यू साऊथ वेल्सकडून खेळलाय. आता त्याची निवड ऑस्ट्रेलियाच्या अंडर 16 संघात झालीये. निवेतनच्या मते त्याचे स्वप्न सत्यात उतरतेय. या स्तरावर चांगली कामगिरी करुन मी अधिक संधी निर्माण करण्याचा प्रयत्न करेन.
8व्या वर्षात घेतली होती हॅटट्रिक
याआधी निवेतनने 14व्या वर्षात तामिळनाडू प्रीमियर लीगमध्ये पदार्पण केले. मात्र तो खरा चर्चेत आला आठव्या वर्षी. चेन्नईमध्ये खेळत असताना टीएनसीएच्या लोअर डिव्हीजन लीग सामन्यात निवेतनने हॅटट्रिक घेतली होती.
दोन्ही हातांनी करतो गोलंदाजी
निवेतनचे खास वैशिष्ट्य म्हणजे तो दोन्ही हातांनी गोलंदाजी करतो. तो वयाच्या सहाव्या वर्षापासून क्रिकेट खेळतोय. सुरुवातीला तो उजव्या हातांनी गोलंदाजी करत असे. मात्र त्यानंतर त्याने डाव्या हातानेही ऑफ स्पिन गोलंदाजी करण्यास सुरुवात केली.