R Ashwin on dangerous batsman in the world cricket : भारताचा दिग्गज गोलंदाज आर अश्विन याची अनेक महिन्यांनी भारताच्या टेस्ट टीममध्ये एंट्री झाली आहे. भारत विरुद्ध बांगलादेश टेस्ट सामन्यासाठी आर अश्विनला टीम इंडियात स्थान मिळाले आहे. अश्विनने एका युट्युब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत क्रिकेटमधील सर्वात विस्फोटक फलंदाजांची निवड केली मात्र यात विराट कोहली आणि रोहित शर्मा यांचा उल्लेख सुद्धा केला नाही. त्याने सर्वात विस्फोटक फलंदाज म्हणून विदेशी खेळाडूंची निवड केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आर अश्विनने विमल कुमार याच्या युट्युब चॅनेलला मुलाखत दिली. यात त्याने इंग्लंडचा जो रूट आणि ऑस्ट्रेलियाच्या स्टीव स्मिथची सर्वात विस्फोटक फलंदाज म्हणून निवड केली. अश्विन या दोघांनाही सर्वात कठीण फलंदाज मानतो, त्यांच्यासमोर गोलंदाजी करणे त्याच्यासाठी नेहमीच आव्हान असते. यावेळी अश्विनला विचारण्यात आले की कोहली आणि रोहित तुम्हाला कठीण फलंदाज वाटत नाही. यावर अश्विनने म्हटले, 'मी त्यांना नेट्समध्ये गोलंदाजी करताना अनेकदा आउट केलंय आपण अनेकदा पाहिलं असेल'.    


जो रूट मोडू शकतो सचिनचा रेकॉर्ड : 


सध्या खास करून जो रूट लागोपाठ चांगली फलंदाजी करत असून मोठा स्कोअर करत आहेत. टेस्ट सामन्यातही त्याच फॉर्म जबरदस्त राहिला. जो रूटने आपल्या टेस्ट करिअरमध्ये एकूण 34 शतक ठोकली आहेत. तर 12402 धावा केल्या आहेत. जो रूट बद्दल असं म्हटलं जाऊ शकतं की यावेळी वर्ल्ड क्रिकेट क्रिकेटमध्ये तोच एक फलंदाज आहे जो सचिनने टेस्ट क्रिकेटमध्ये बनवलेल्या सर्वात जास्त धावांचा रेकॉर्ड मोडू शकतो.  सचिन तेंडुलकरने टेस्ट क्रिकेटमध्ये एकूण 15921 धावा बनवल्या होत्या आणि 51 शतक ठोकली होती. तर जो रूट सचिनचा रेकॉर्ड मोडण्यासाठी 3,519 धावा दूर आहे. काही दिवसांपूर्वीच सचिन हा इंग्लंडचा सर्वात जास्त टेस्ट शतक ठोकणारा फलंदाज बनला होता. 


हेही वाचा : युवराज सिंहने बेस्ट प्लेईंग 11 मध्ये धोनीला केलं इग्नोर, थालाचे फॅन्स भडकले, पाहा VIDEO


 


भारत विरुद्ध बांगलादेश : 


भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात 19 आणि 27 सप्टेंबर रोजी दोन सामन्यांची टेस्ट सिरीज पार पडणार आहे. तर त्यानंतर दोन्ही संघांमध्ये टी 20 सिरीज सुद्धा खेळवण्यात येईल. यातील पहिला सामना हा 6 ऑक्टोबर रोजी मध्य प्रदेशच्या स्टेडियममध्ये पार पडेल. 


पहिल्या टेस्ट सामन्यासाठी भारतीय संघ :  


रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जायसवाल, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सरफराज खान, ऋषभ पंत (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), आर अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आकाश दीप, जसप्रीत बुमराह आणि यश दयाल.