T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा कॅप्टन कोण? गौतम गंभीरने Hardik Pandya नाही तर घेतलं `या` खेळाडूचं नाव!
Gautam Gambhir On India captain : पुढील वर्षी वेस्ट इंडिज आणि अमेरिका यांच्या संयुक्त विद्यमाने टी-ट्वेंटी वर्ल्ड कप (T20 World Cup 2024) आयोजित केला जाईल. त्याआधी टीम इंडियाचा स्टार गौतम गंभीर याने मोठं वक्तव्य केलंय.
T20 World Cup 2024 : वनडे वर्ल्ड कप 2023 नंतर टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा (Rohit Sharma) राजीनामा देऊ शकतो, अशी जोरदार चर्चा होताना दिसत आहे. रोहित शर्मा गेल्या एक वर्षापासून टी-ट्वेंटी क्रिकेट खेळला नाही. त्यामुळे आता तो थेट आयपीएलमध्येच (IPL 2024) खेळताना दिसेल. अशातच आता 2024 मध्ये होणाऱ्या टी-ट्वेंटी वर्ल्ड कपसाठी (T20 World Cup 2024) टीम इंडियाचा जबाबदारी कोणाच्या खांद्यावर असेल? असा सवाल विचारला जात आहे. सध्या कर्णधारपदाच्या दाव्यासाठी दोन उमेदवार रिंगणात आहेत. पहिला म्हणजे हार्दिक पांड्या आणि दुसरा केएल राहुल... मात्र, टीम इंडियाचा माजी सलामीवीर फलंदाज गौतम गंभीरने (Gautam Gambhir On India captain) मोठं वक्तव्य केलं आहे.
टीम इंडियाच्या कर्णधारपदी कोणाला संधी दिली जावी, असा प्रश्न गंभीरला (Gautam Gambhir) विचारला गेला. वनडे वर्ल्ड कपमध्ये गंभीरने टीम इंडियाच्या कामगिरीवर अचूक विश्लेषण केलं होतं. अशातच आगामी टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup 2024) कोणाला नेतृत्वाची संधी दिली जावी? असा सवाल गंभीरला विचारण्यात आला होता. त्यावेळी त्याने नाही केएल राहुलचं नाव घेतलं ना त्याने हार्दिकला पसंती दर्शवली.
काय म्हणाला Gautam Gambhir ?
हार्दिक पांड्या गेल्या वर्षापासून भारतीय टी-ट्वेंटी संघाचे नेतृत्व करत असला तरी, वेस्ट इंडिज आणि अमेरिका यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या टी-ट्वेंटी वर्ल्ड कपचे नेतृत्व रोहित शर्माने (Rohit Sharma) केलं पाहिजं. रोहित शर्मा आणि विराट कोहली (Virat Kohli) या दोघांचीही 2024 च्या टी-ट्वेंटी विश्वचषकासाठी भारतीय संघात निवड करावी, अशी इच्छा गौतम गंभीर याने व्यक्त केली आहे. वर्ल्ड कपमध्ये रोहित शर्माने दाखवून दिलंय की तो फलंदाजीत काय करू शकतो. रोहित शर्माची निवड झाल्यास विराट कोहलीची निवड आपोआप होईल. रोहित शर्माची फक्त फलंदाज म्हणून नाही तर कर्णधार म्हणून त्याची निवड केली जावी, असंही गौतम गंभीर याने म्हटलं आहे.
आणखी वाचा -
दरम्यान, गौतम गंभीर पुन्हा एकदा कोलकाता टीमचा मार्गदर्शक म्हणून संघात सामील होणार आहे. गौतम गंभीरने 2012 ते 2017 या कालावधीत आयपीएलच्या कोलकाता नाईट रायडर्स (KKR) संघाला मार्गदर्शन करत होता. त्यानंतर त्याने लखनऊ सुपर जायन्ट्स (LSG) संघाची जबाबदारी खांद्यावर घेतली होती. त्यानंतर तो पुन्हा केकेआरकडे जाईल अशी शक्यता होती. अखेर केकेआर टीमकडून गौतम गंभीर पुन्हा एकदा मार्गदर्शक म्हणून परतणार याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.