मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सतत चर्चेत आहे.  सोशल मीडियावर सक्रिय असलेली उर्वशी ही तिच्या पोस्टमुळे चर्चेत आहे. तिनं केलेल्या सर्व पोस्ट या सध्या ऋषभ पंतशी जोडल्याचे पाहायला मिळते. उर्वशी नक्की कोणासोबत रिलेशनशिपमध्ये आहे असा प्रश्न फक्त तिच्या चाहत्यांना नाही तर नेटकऱ्यांनाही पडला आहे. उर्वशीनं एका मुलाखतीत तिच्या आयुष्यात असणाऱ्या RP चा उल्लेख केला होता. आता हा RP नक्की कोण आहे असा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे. आता उर्वशीनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत मिस्टर आरपीविषयी सांगितलं आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उर्वशीचा तो व्हायरल झालेला व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांना वाटलं की तिनं उल्लेख केलेला MR. RP दुसरा तिसरा कोणी नसून ऋषभ पंत आहे. तसेच, टी-20 विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलियात भारतीय पुरुष क्रिकेट संघ त्याच वेळी ऑस्ट्रेलियाला रवाना झाला. तिच्या काही फोटो आणि व्हिडीओंवरून नेटकऱ्यांनी तर्कवितर्कांना खतपाणी घालत होतं.  



दरम्यान, आता उर्वशीनं खुलासा केला आहे की तिचा आरपी कोण आहे. हा आरपी ऋषभ पंत नसल्याचं तिनं सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोंमधून दिसत आहे. उर्वशीनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक फोटो शेअर केला आहे. या पोस्टमध्ये उर्वशीनं दाक्षिणात्य अभिनेता राम पोथिनेनीसोबत एक फोटो पोस्ट केला आणि खुलासा केला की तिच्या आयुष्यातील मिस्टर आरपी ऋषभ पंत नसून राम पोथीनेनी आहे. अभिनेत्यासोबतचे फोटो शेअर करताना तिने #love #UrvashiRautela #UR1 #Rampothineni देखील वापरले आहे. (not rishabh pant this person is urvashi rautela s rp leaves netizens and fans are confused )


उर्वशीच्या फोटोंवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत आणि मजेदार कमेंट्स केल्या आहेत. एका नेटकऱ्यानं लिहिलं की, 'ऋषभ भाई दिसत आहे.' दुसऱ्याने नेटकऱ्यानं कमेंट केली की, 'ठीक आहे, हा आरपी आहे.' त्याचवेळी एकाने विचारले, 'तू कोण आहेस?' उर्वशीच्या पोस्टमुळे चाहते थोडे आश्चर्यचकित झाले आहेत, कारण आतापर्यंत त्यांना वाटत होते की उर्वशीच्या पोस्ट इतर कोणाशी संबंधितनसून ऋषभ पंत यांच्याशी संबंधित आहेत. दरम्यान, बोयापती श्रीनू दिग्दर्शित राम पोथीनेनी चित्रपटासाठी उर्वशी रौतेलाला साईन केल्याचेही म्हटले जात आहे.