या खेळाडूचा किक्रेटला रामराम, टीममध्ये निवड न झाल्याने घेतला निर्णय
या खेळाडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्याची घोषणा केली.
कोलंबो : श्रीलंकाचा अनुभवी वेगवान गोलंदाज नुवान कुलसेकरा याने आज बुधवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्याची घोषणा केली. कुलेसेकरा याने २००३मध्ये इंग्लंड विरुद्ध वनडेमध्ये पदार्पण केले. त्यांने २०१७ मध्ये श्रीलंकासाठी आपला शेवटचा वनडे सामना खेळला.
दरम्यान, कुलसेकरा आपला निरोपाचा सामना खेळून क्रिकेट जगतात अलविदा करण्याची शक्यता सूत्रांकडून व्यक्त होत होती. तशी मागणी केली होती. मात्र, त्याची मागणी निवड समितीने मान्य केली नाही. त्यानंतर त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.
कुलसेकरा याने एकदिवसी सामन्यांमध्ये सर्वाधिक विकेट घेणारे श्रीलंकेचा पाचवा गोलंदाज ठरला आहे. त्याच्या नावे १८४ सामन्यात त्याने १९९ विकेट घेतल्या आहेत. कुलसेकरा याने २१ कसोटी सामन्यात ४८ विकेट घेतल्या आहे.
याशिवाय त्याने टी -२० मध्ये सर्वाधिक विकेट घेण्यामध्ये लसिथ मलिंगासह संयुक्तपणे दुसरा श्रीलंकन गोलंदाज आहे. कुलसेकराच्या खात्यात ५८ सामन्यात ६६ विकेट आहेत. मलिंगा यानेदेखील बांग्लादेशबरोबर खेळलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यानंतर निवृत्ती घेतली.
कुलसेकरा याने २०११मध्ये विश्वचषक स्पर्धेत भारताविरुद्ध शेवटचे षटक टाकले होते. त्याचा या षटकात महेंद्र सिंह धोनी याने षटकार ठोकत भारताला दुसऱ्यांदा विश्वचषक मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला.
श्रीलंकाचा कर्णधार दिमुथ करुणरत्ने याने म्हटले आहे, मलिंगा पहिल्या एकदिवसीय सामन्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करेल. त्याला २२ सदस्यीय टीम समाविष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, मलिंगा याने पुढील वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी -२० विश्व कपमध्ये खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे.