कॅनबेरा : टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड (NZ vs IND) यांच्यातील 3 सामन्यांच्या टी 20 मालिकेला शुक्रवारी 18 नोव्हेंबरपासून सुरुवात होत आहे. हार्दिक पंड्याच्या (Hardik Pandya) नेतृत्वात टीम इंडिया (Team India) केन विलियमसनच्या (Kane Williamson) न्यूझीलंड (New Zealand) विरुद्ध भिडणार आहे.  या मालिकेसाठी क्रिकेट चाहत्यांमध्ये उत्सूक आहेत. मात्र क्रिकेट चाहत्यांसाठी वाईट बातमी समोर आली आहे. (nz vs ind t20 series telecast on amezon prime app and website)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

क्रिकेट चाहत्यांना टीम इंडिया-न्यूझीलंड यांच्यातील टी 20 सीरिज टीव्हीवर पाहता येणार नाही. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांचा हिरमोड होऊ शकतो. या सीरिजचं टेलिकास्ट अ‍ॅमेझॉन प्राईम अ‍ॅप आणि वेबसाईटवर होणार आहे. सोनी टीव्ही आणि स्टार स्पोर्ट्सकडे या सीरिजच्या टेलिकास्टचे राईट्स नाहीत. मात्र डीडी स्पोर्ट्सवर या सीरिजमधील सर्व सामन्यांचं प्रक्षेपण केलं जाऊ शकतं.


न्यूझीलंड विरुद्धच्या टी 20 सीरिजसाठी टीम इंडिया


हार्दिक पंड्या (कॅप्टन), ऋषभ पंत (उपकर्णधार/ विकेटकीपर), शुबमन गिल, ईशान किशन, दीपक हुड्डा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन (विकेटकीपर), वॉशिंगटन सुंदर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंह, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार आणि उमरान मलिक.


टी 20 सीरिससाठी टीम न्यूझीलंड


केन विलियमसन (कर्णधार), फिन एलन, माइकल ब्रेसवेल, डेवोन कॉन्वे, लॉकी फर्ग्यूसन, डेरिल मिचेल, एडम मिल्ने, जिमी नीशम, ग्लेन फिलिप्स, मिचेल सेंटनर, ईश सोढी आणि टिम साउथी. ब्लेयर टिकनर.