कॅनबेरा : टी 20  वर्ल्ड कप 2022 (T 20 World Cup 2022) सेमी फायनलसाठी (Semi Final) 4 टीम ठरल्या आहेत. या सेमी फायनलमधील पहिला सामना हा पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड (PAK vs NZ) यांच्यात रंगणार आहे. तर दुसरी सेमी फायनल टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड (IND vs ENG) यांच्यात होणार आहे. साखळी सामन्यात नेदरलँडने दक्षिण आफ्रिकेचा (NED vs SA) पराभव केल्याने पाकिस्तानचं नशीब फळफळलं. नेदरलँडच्या या विजयामुळे पाकिस्तनाची (Pakistan) सेमी फायनलची तिकीट 'फायनल' झाली. पाकिस्तान सेमी फायनलमध्ये पोहचल्याने क्रिकेट चाहत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. हाच उत्साह लक्षात घेता सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. (nz vs pak t 20 world cup semi final 2022 pakistan pmo announced public holiday on 9 november for iqbal day)



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाकिस्तान सरकारने 9 नोव्हेंबरला डॉक्टर अलामा मोहम्मद इकबाल (Iqbal Day) यांच्या 145 व्या वाढदिवसाच्यानिमित्ताने ही सुट्टी जाहीर केली आहे. पाकिस्तानच्या पीएमओ कार्यालयाने सुट्टीची घोषणा केली आहे. डॉक्टर इकबाल आणि पाकिस्तानचा सेमी फायनल सामना एकाच दिवशी योग जुळून आला आहे. 



टी 20 वर्ल्ड कपसाठी टीम पाकिस्तान 


बाबर आझम (कॅप्टन), शादाब खान, आसिफ अली, फखर जमा, हैदर अली, हारिस रऊफ, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, मोहम्मद हसनैन, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिजवान, मोहम्मद वसीम जूनियर, नसीम शाह , शाहीन शाह आफरीदी आणि शान मसूद. 


टीम न्यूझीलंड


केन विलियमसन (कर्णधार), टिम साउथी, ईश सोढी, मिचेल सेंटनर, ग्लेन फिलिप्स, जिमी नीशम, डेरेल मिचेल, एड्म मिलने, मार्टिन गुप्टील, लोकी फर्ग्युसन, डेवॉन कॉन्वे, मार्क चॅपमैन, मिचेल ब्रेसवेल, ट्रेन्ट बोल्ट आणि फिन एलेन.