मुंबई : भारत आणि वेस्ट इंडिज दरम्यानची अखेरची आणि निर्णायक एकदिवसीय लढत आज पोर्ट ऑफ स्पेन येथे रंगणार आहे. मालिका जिंकण्याच्या इराद्यानंच भारतीय क्रिकेट संघ आज मैदानात उतरेल. या सामन्यासह मालिका जिंकण्याच्या निर्धाराने टीम इंडिया तर मालिका १-१ अशी बरोबरीत सोडविण्याच्या निर्धाराने विंडिज संघ मैदानात उतरणार आहे.  दुसरी वन-डे जिंकून कोहली टीमने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता. तर दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाने विजय साकराला होता. टी-२० मालिका टीम इंडियाने जिंकली होती. आता एकदिवसीय मालिका जिंकण्याची संधी कोहली टीमसमोर आहे. यानतंर दोन कसोटींची मालिका खेळली जाईल. 


वेस्ट इंडिजपेक्षा भारताची गोलंदाजी अधिक सरस आहे. भुवनेश्वर, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, कुलदीप यादव, यजुवेंद्र चहल यांच्या समावेशाने संघाची गोलंदाजी अधिक भक्कम बनली आहे. तर वेस्ट इंडिजचा स्फोटक फलंदाज आणि युनिव्हर्स बॉस ख्रिस गेलचा हा मायदेशातील आणि कारकिर्दीतील शेवटचा एक दिवसीय सामना असेल.  


दरम्यान, टीम इंडियाला खरी चिंता आहे ती सलामीवीर शिखर धवनची. त्याची कामगिरी कशी होणार, याची उत्सुकता आहे. या डावखुर्‍या फलंदाजाने टी-२० मालिकेत १ आणि २३ तर दुसर्‍या वन- डेत अवघ्या २ धावा केल्या आहेत. आज धवनला आजच्या वन-डेत मोठी खेळी करण्याची गरज आहे.