दुबई : 2021च्या T20 वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचणारा न्यूझीलंड हा पहिला संघ ठरलाय आहे. बुधवारी झालेल्या पहिल्या उपांत्य फेरीत न्यूझीलंडने इंग्लंडचा पराभव केला. या सामन्यात ब्रिटीशांची आघाडी दिसून येत होती, पण न्यूझीलंडने अखेरच्या ओव्हरमध्ये उलथापालथ करून सामना जिंकला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान टी-20 वर्ल्डकप सुरू झाला तेव्हा न्यूझीलंड हा अंतिम फेरीत पोहोचणारा पहिला संघ असेल असं कुणालाही वाटलं नव्हतं, पण यावेळीही त्याने सर्वांनाच चकित केलं आहे.


गेल्या काही वर्षातील क्रिकेटविश्वातील स्थिती पाहिली, तर ऑस्ट्रेलियाचा संघ उतरणीला लागल्यावर दोनच संघांचं वर्चस्व राहिलं आहे. भारताचा संघ आणि न्यूझीलंड, टीम इंडियाने सातत्याने सामने जिंकले आहेत, परंतु आयसीसी स्पर्धांमध्ये प्रत्येक वेळी न्यूझीलंडचा संघ जिंकला आहे. 


सलग तीन आयसीसी स्पर्धांच्या अंतिम फेरीत...


2015 च्या वर्ल्डकपपासून ते 2021च्या T20 वर्ल्डकपच्या फायनलपर्यंत न्यूझीलंडचा कायाकल्प पहायला मिळाला आहे. गेल्या दोन वर्षांत, न्यूझीलंडने तीन आयसीसी स्पर्धांची अंतिम फेरी गाठली, तेही तीन वेगवेगळ्या फॉरमॅटमध्ये. 2019 एकदिवसीय वर्ल्डकप फायनल प्रथम इंग्लंडकडून हरले होते, 2021 मध्ये कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत भारताचा पराभव करून चॅम्पियन बनले होते. आणि आता T20 वर्ल्डकप 2021च्या अंतिम फेरीत पोहोचला आहे.


केन विलियम्सनची कमाल


केन विलियम्सनची गणना फॅब-4 मध्ये केली जाते, ज्याला विराट कोहली, जो रूट, स्टीव्ह स्मिथ आणि केन विल्यमसन म्हणतात. म्हणजेच सध्याच्या काळातील सर्वोत्तम फलंदाज. केन विल्यमसन प्रत्येक फॉरमॅटमध्ये चांगली फलंदाजी करतो. त्याचे रेकॉर्ड बरेच चांगले आहेत आणि कर्णधारपद या गोष्टींमध्ये भर घालते. शांत स्वभावाचा केन विल्यमसन हा सध्याचा आइसमॅन आहे, जो आपले काम शांतपणे करतो आणि संघाला फायदा होतो.


यंदाच्या वर्ल्डकपमध्ये न्यूझीलंडला पहिल्याच सामन्यात पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. पाकिस्तानने न्यूझीलंडचा मोठ्या फरकाने पराभव केला होता. पण नंतर न्यूझीलंडने पुनरागमन करत भारत, स्कॉटलंड, नामिबिया, अफगाणिस्तान यांचा पराभव करून उपांत्य फेरी गाठली. जर न्यूझीलंडचा शेवटच्या सामन्यात अफगाणिस्तानकडून पराभव झाला असता तर भारताचा संघ उपांत्य फेरीत पोहोचू शकला असता.