England Squad for World Cup 2023: क्रिकेटचाहत्यांना उत्सुकता आहे ती क्रिकेट एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेची (ODI World Cup). पाच ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबरदरम्यान भारतात ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. या स्पर्धेसाठी सर्वच संघांची जोरदार तयारी सुरु आहे. इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड (England vs New Zealand) दरम्यानच्या सामन्याने या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. तर टीम इंडियाच्या (Team India) मिशन वर्ल्ड कप स्पर्धेला 8 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. टीम इंडियाचा पहिला सामना बलाढ्य ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. तर करोडो क्रिकेटप्रेमींना उत्सुकता असलेला भारत-पाकिस्तान सामना 14 ऑक्टोबरला खेळवला जाणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विश्वचषचकासाठी संघाची घोषणा
एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेसाटी इंग्लंडने (Enland) 15 खेळाडूंच्या संघाची घोषणा केली आहे. या संघात अष्टपैलू बेन स्टोक्सला (Ben Stokes) संधी देण्यात आली आहे. स्टोक्सने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. पण आता त्याने निवृत्ती मागे घेतली आहे. इंग्लंड एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेतला गतविजेता संघ असून सलामीचा सामना खेळण्याच्या मान त्यांना मिळणार आहे. स्पर्धेतील पहिला सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर खेळवला जाणार आहे. 


बेन स्टोक हुकमी एक्का
2019 मध्ये इंग्लडमध्ये एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा खेळवण्यात आली होती. यावेळी यजमान इंग्लंडने न्यूझीलंडचा पराभव करत पहिल्यांदा विश्वचषकावर आपलं नाव कोरलं. इंग्लंडच्या विजयाचा हिरो ठरला होता तो बेन स्टोक्स. स्टोक्सने एकहाती इंग्लंडला चॅम्पियन बनवलं होतं. 


2019 ची विश्वचषक स्पर्धा वादग्रस्त ठरली होती. इंग्लंड आणि न्यूझीलंडदरम्यानचा अंतिम सामना टाय झाला. योगायोग म्हणजे त्यानंतर खेळवण्यात आलेली सुपर ओव्हरही बरोबरीत सुटली. त्यानंतर बाऊंड्री काऊंट नियम म्हमजे सर्वात जास्त चौकार मारणाऱ्या संघाला म्हणजे इंग्लंडला चॅम्पियन घोषित करण्यात आलं होतं. हा नियमावरुन क्रिकेट जगतात चांगलाच वाद झाला होता. नंतर हा नियम हटवण्यात आला. 


बेन स्टोक्सने निवृत्ती घेतली मागे
कसोटी क्रिकेटवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी बेन स्टोक्सने जुलै 2022 मध्ये एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. पण इंग्लंड क्रिकेट बोर्ड आणि कर्णधार जोस बटलर स्टोक्सची समजूत घालण्यात यशस्वी ठरले. त्यामुळे बेन स्टोक्सने निवृत्तीचा निर्णय मागे घेतला असून त्याला पंधरा खेळाडूंच्या संघातही संधी देण्यात आली आहे. 


विश्वचषकासाठी इंग्लंडचा संघ
जोस बटलर (कर्णधार), मोईन अली, जॉनी बेयरस्टो, गस एटकिंगसन, सॅम कुरेन, लियाम लिविंगस्टोन, डेविड मलान, आदिल राशिद, जो रूट, जेसन रॉय, बेन स्टोक्स, रीस टॉपली, डेविड विली, मार्क वुड आणि क्रिस वॉक्स.