ICC ODI World Cup 2023: येत्या 5 ऑक्टोबरपासून भारतात एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेला सुरुवात होणार आहे. यंदा भारत या विश्वचषक स्पर्धेचा आयोजक देश आहे. करोडो भारतीय क्रिकेट चाहत्यांकडून टीम इंडियाकडून (Team India) मोठ्या अपेक्षा आहेत. पण रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखालील टीम इंडिया क्रिकेट चाहत्यांच्या अपेक्षा पूर्ण करणार का? हा प्रश्न आहे. 2011 विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचा खेळाडू युवराज सिंगने  (Yuvraj Singh) यंदाच्या विश्वचषकासंदर्भात सोशल मीडियावर एक प्रश्न विचारला आहे. याचं उत्तर वीरेंद्र सेहवाने (Virendra Sehwag) दिलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वीरेंद्र सेहवगाची भविष्यवाणी
महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने दुसऱ्यांदा विश्वचषकाला गवसणी घातली. युवराज सिंह (Yuvraj Singh) आणि वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) या विजेत्या संघातील खेळाडू होते. अशीच कामगिरी आता रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया करणार का असा प्रश्न विचारला जात आहे. युवराज सिंहने यासंदर्भात एक्सवर एक प्रश्न विचारला आहे.  टीम इंडिया दबावाला गेम चेंजरमध्ये बदलू शकेल का? याला सेहवागने अगदी तोडीसतोड उत्तर दिलं आहे. त्याने म्हटलं टीम इंडिया वादळ निर्माण करेल.


युवराज सिंहने आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय, 2023 मध्ये 2011 च्या विश्वचषक विजयाची पुनरावृत्ती व्हावी असं आम्हाला वाटतं, पण 2011 मध्ये टीम इंडिया दबावातून वरती आली होती. आता 2023 मध्ये टीम इंडिया पुन्हा एकदा दबावाखाली आहे. टीम इंडिया पुन्हा बाजी पलटवणार का? या दबावाला गेम चेंजरमध्ये बदलवण्यात टीम इंडिया यशस्वी ठरणार का? असे प्रश्न युवराज सिंगने उपस्थित केले आहेत. याला वीरेंद्र सेहवागनेही उत्तर दिलं आहे. 


सेहवागने म्हटलंय, इतिहास पाहिला तर गेल्या बारा वर्षात आयोजक संघच विश्वचषक स्पर्धा जिंकला आहे. 2011 भारताने भारतात, 2015 मध्ये ऑस्ट्रेलियाने ऑस्ट्रेलियात आणि  2019 मध्ये इंग्लंडमध्ये इंग्लंडने विश्वचषक जिंकण्याची किमया केली.आता 2023 मध्ये पुन्हा एकदा विश्वचषक स्पर्धा भारतात होणार आहे. त्यामुळे पुन्हा एकाद विश्वचषक भारताच्या नावावर होईल. असं भाकित सेहवगाने वर्तवलं आहे. 


वर्ल्ड कप 2023 मध्ये टीम इंडियाचं वेळापत्रक
8 ऑक्टोबर : भारत vs ऑस्ट्रेलिया, चेन्नई
11 ऑक्टोबर : भारत vs अफगाणिस्तान, नई दिल्ली
14 ऑक्टोबर : भारत vs पाकिस्तान, अहमदाबाद
19 ऑक्टोबर : भारत vs बांग्लादेश, पुणे
22 ऑक्टोबर : भारत vs न्यूजीलँड, धर्मशाला
29 ऑक्टोबर : भारत vs इंग्लंड, लखनऊ
2 नोव्हेंबर : भारत vs श्रीलंका, मुंबई
5 नोव्हेंबर : भारत vs साउथ अफ्रीका, कोलकाता
12 नोव्हेंबर : भारत vs नीदरलँड्स, बंगळुरु