छोरी धाकड है! शुटिंगच नाही तर मनू भाकर `या` कामातही एक्सपर्ट, `तो` जुना व्हिडीओ व्हायरल
Manu Bhaker Viral Video : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नेमबाजपटू मनू भाकरने दोन पदकं जिंकली. अशी कामगिरी करणारी ती पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे. अशातच तिचा एक व्हिडीओ व्हायरल झालाय.
Manu Bhaker playing national anthem on violin : सध्या पॅरिसमध्ये सुरू असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारतासाठी अजून एक आनंदाची बातमी समोर आली आहे. नेमबाजपटू मनू भाकर हिने महिलांच्या 10 मीटर पिस्टल नेमबाजी प्रकारात कांस्यपदकाला गवसणी घातली होती. त्यानंतर आता मनू भाकर आणि सरबज्योत सिंग यांनी देखील 10 मीटर पिस्टल मिश्र स्पर्धेत भारताला दुसरं पदक मिळवून दिलं. दोघांनी अचूक नेम भेदला आणि कांस्यपदक जिंकलं. भारताला दोन पदकं जिंकून दिल्याबद्दल सध्या मनू भाकरचं कौतूक होताना दिसत आहे. अशातच आता मनू भाकरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
सोशल मीडियावर मनू भाकरचा एक व्हिडीओ व्हायरल झाल्याचं दिसतंय. या व्हिडीओमध्ये मनू भाकरने व्हायोलिनवर राष्ट्रगीत वाजवताना दिसत आहे. एका स्विमिंग पूलच्या बाजूला मनू भाकर मन लावून व्हायोलिन वाजवताना दिसतीये. तिचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला असून अनेकांनी तिच्या या कलेचं कौतूक देखील केलंय तब्बल 90 लाख लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे.
पाहा video
ऑलिम्पिक स्पर्धेत नेमबाजीमध्ये पदक पटकवणारी मनू भाकर पहिली महिला नेमबाज ठरली आहे. गेल्या 12 वर्षांत भारताने नेमबाजीमध्ये कोणतंही पदक मिळवलं नव्हतं. आता मनूने हा दुष्काळ संपवलाय. अशातच आता मनूच्या अद्वितिय कामगिरीनंतर तिच्या घरी आनंदाला उधाण आलंय. मनूच्या कुटुंबांनी आनंद व्यक्त केला. आम्हाला आमच्या मुलीवर गर्व वाटतो, असं मनूची आई म्हणाली.
मनू भाकर धार्मिक देखील आहे. मी गिता वाटते आणि जसं श्रीकृष्णाने अर्जुनाला उपदेश दिले होते, तसंच मी माझ्या आयुष्यात पाळण्याचा प्रयत्न करते. कर्म करा फळाची चिंता करु नको हेच कृष्णाने सांगितलं असून मी त्याचाच विचार करत होते. मी फक्त प्रयत्न केले, असं मनूने विजयानंतर सांगितलं होतं.
दरम्यान, मनुने झज्जर विद्यापीठ पब्लिक स्कूलमधून सिनिअर सेकेंडरीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. सध्या ती दिल्ली विद्यापीठाच्या लेडी श्रीराम कॉलेजमध्ये पॉलिटिकल सायन्समधून पदवी पूर्ण करतेय. विविध मीडिया रिपोर्टनुसार मनू भाकरचे नेटवर्थ 12 कोटी रुपये इतके आहे. तिच्याकडे असलेली संपत्तीची रक्कम ही स्पॉन्सर्सकडून मिळालेली आहे. मनूने कॉमनवेल्थ गेम्समध्ये मेडल्स जिंकले आहेत. यानंतर हरियाणा सरकारने तिला 2 कोटी रुपये दिले होते. रिपोर्टनुसार, पॅरिस ऑलिम्पिक 2024 साठी मनू भाकरवर केंद्र सरकारने 1.7 कोटी रुपये खर्च केले होते.