लंडन : भारत आणि इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या टेस्ट सीरिजमध्ये जेम्स अंडरसन सगळ्यात घातक बॉलर दिसत आहे. अंडरसननं या सीरिजमध्ये आत्तापर्यंत सर्वाधिक १७ विकेट घेतल्या आहेत. याचबरोबर अंडरसनच्या टेस्ट क्रिकेटमधल्या विकेटची संख्या ५५७ झाली आहे. सर्वाधिक विकेट घेणाऱ्या खेळाडूंच्या यादीमध्ये अंडरसन पाचव्या क्रमांकावर आहे. मुथय्या मुरलीधरन(८००), शेन वॉर्न(७९८), अनिल कुंबळे(६१९) आणि ग्लेन मॅक्ग्रा(५६३) हे टेस्टमध्ये सर्वाधिक विकेट घेणारे खेळाडू आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ग्लेन मॅक्ग्राचं रेकॉर्ड मोडण्यासाठी अंडरसनला आणखी ७ विकेटची गरज आहे. ३० ऑगस्टपासून भारत आणि इंग्लंडमधल्या चौथ्या टेस्ट मॅचला सुरुवात होत आहे. याच मॅचमध्ये अंडरसननं ७ विकेट घेतल्या तर तो टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा फास्ट बॉलर बनेल.


मी जेम्स अंडरसनचा सन्मान करतो. जेव्हा अंडरसन माझं रेकॉर्ड मोडेल त्यानंतर कोणत्याही फास्ट बॉलरला हे रेकॉर्ड मोडता येणार नाही, अशी प्रतिक्रिया ग्लेन मॅक्ग्रानं दिली आहे.


अंडरसनच्या भारताविरुद्ध १०३ विकेट


अंडरसन हा अशा ७ बॉलरपैकी एक आहे ज्यानं दोन किंवा तीन देशांविरुद्ध खेळताना १०० पेक्षा अधिक टेस्ट विकेट घेतल्या आहेत. अंडरसननं ऑस्ट्रेलियाविरुद्ध १०४ आणि भारताविरुद्ध १०३ विकेट घेतल्या आहेत. अंडरसननं सचिन तेंडुलकरला ११ वेळा, मुरली विजयला ७ वेळा आणि विराट कोहलीला ५ वेळा आऊट घेतलं आहे. या सीरिजमध्ये अंडरसननं विराटची एकदाही विकेट घेतलेली नाही.