AUS vs SA: भारताविरूद्ध एकतर्फी...; फायनल सामन्यापूर्वी पॅट कमिंसचं टीम इंडियाविषयी मोठं वक्तव्य
AUS vs SA: मुख्य म्हणजे हा सामना जिंकण्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना देखील संघर्ष करावा लागला. अखेरीस ऑस्ट्रेलियाने 3 विकेट्स राखून ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेवर विजय मिळवला.
AUS vs SA: 16 नोव्हेंबर रोजी कोलकात्याच्या ईडन गार्डन्स स्टेडियमवर दक्षिण आफ्रिका विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात दुसरी सेमीफायनल रंगली होती. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत थेट फायनलमध्ये प्रवेश केला आहे. या पराभवासह दक्षिण आफ्रिकेचा वर्ल्डकपमधील प्रवास संपुष्टात आला आहे. तर फायनलमध्ये धडक दिल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिंस फार खूश असल्याचं दिसतंय.
मुख्य म्हणजे हा सामना जिंकण्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना देखील संघर्ष करावा लागला. अखेरीस ऑस्ट्रेलियाने 3 विकेट्स राखून ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेवर विजय मिळवला. विजयानंतर पॅट कमिन्स खूप आनंदी दिसत होता. फायनल खेळण्यापूर्वी त्याने टीम इंडियाबाबत मोठं विधान केलं आहे.
फायनल सामन्यापूर्वी काय म्हणाला पॅट कमिंस?
पॅट कमिंस म्हणाला की, मला वाटतं डगआउटमध्ये बसण्यापेक्षा तिथे उपस्थित असणं सोपं होतं. काही तास भीती होती पण सामन्याचे परिणाम चांगले झाले. स्टार्क आणि हेझलवूड एवढ्या लवकर गोलंदाजी करतील असे वाटले नव्हते. आम्ही प्रथम गोलंदाजी करण्याबाबत फारसे निराश झालो नाही.
आमच्या टीममधील काहीजण यापूर्वी फायनलमध्ये खेळले. काहीजण टी-20 वर्ल्डकप फायनलमध्ये खेळले आहेत. यावेळी कदाचित स्टेडियम खचाखच भरलेलं असेल, बहुतेक एकतर्फी असेल. 2015 चा वर्ल्डकप हा माझ्या कारकिर्दीतील मोठ्या क्षणांपैकी एक होता. मी भारतात आणखी एक वर्ल्डकपची फायनल खेळेन असं मला कधीच वाटलं नव्हतं.
ऑस्ट्रेलियाचा दक्षिण आफ्रिकेवर 3 विकेट्सने विजय
दक्षिण आफ्रिकेने या सामन्यात टॉस जिंकून प्रथम फलंदाजीला सुरुवात केली. मात्र हा निर्णय त्यांच्यासाठी फारच निराशाजनक होता. दक्षिण आफ्रिकेची सुरुवात खूपच खराब झाली. आफ्रिकेची टॉप ऑर्डर पूर्णपणे कोलमडली. मात्र मिडल ऑर्डरमध्ये फलंदाजीला आलेल्या डेव्हिड मिलरने 5 सिक्स आणि 8 फोरच्या मदतीने 101 रन्सची शानदार खेळी केली. हेनरिक क्लासेननेही 48 रन्सचं योगदान दिले. ज्यामुळे दक्षिण आफ्रिकेचा स्कोर 212 पर्यंत पोहोचला.
दक्षिण आफ्रिकेने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाला खूप संघर्ष करावा लागला. चांगली सुरुवात करूनही ऑस्ट्रेलियाने 47.2 ओव्हरमध्ये सामना गमावला. ऑस्ट्रेलियाकडून ट्रॅव्हिस हेडने सर्वाधिक म्हणजेच 62 रन्सची खेळी केली. या सामन्यात कर्णधार पॅट कमिंसनेही चांगला खेळ केला.