Sachin Tendulkar Vs Yuvraj Singh : सत्य साई ग्राम मुद्देनहल्ली क्रिकेट स्टेडियम, बंगळुरू येथे वन वर्ल्ड वन फॅमिली कपचे (One World One Family Cup) आयोजन करण्यात आलं होतं. या सामन्यात सचिनच्या टीम वन वर्ल्डने युवराज सिंगच्या टीम वन फॅमिलीचा 4 गडी राखून पराभव केला आहे. प्रथम फलंदाजी करताना युवराज संघाने 6 गडी गमावून 180 धावा केल्या. सचिनच्या टीम वन वर्ल्डने 19.5 षटकांत 6 गडी गमावून 184 धावा करून सामना जिंकला. अखेरच्या दोन बॉलमध्ये तीन धावांची गरज होती तेव्हा इरफान पठाणने भाऊ युसूफ पठाणला खणखणीत सिक्स मारत सामन्याचा निकाल बदलला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वन फॅमिला संघचा कर्णधार युवराज सिंगने 10 चेंडूत 23 धावांची खेळी केली. त्यात दोन गगणचुंबी षटकार आणि खणखीत दोन फोरचा समावेश होता. युसूफ पठाणने आक्रमक फलंदाजी करताना 28 चेंडूत 33 धावांची तुफानी खेळी केली. तर सचिन, पानेसर, आरपी सिंग आणि अशोक डिंडा यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली. तर दुसऱ्या बाजूने मॅडीने 41 चेंडूत 51 धावांची खेळी खेळली. रोमेश कलुवितरत्नने 15 चेंडूत 22 धावांची खेळी केली. त्याचबरोबर सचिन तेंडूलकरने 16 बॉलमध्ये 27 धावांची खेळी केली. मुथय्या मुरलीधरनने मास्टर ब्लासर सचिन तेंडूलकरची विकेट घेतली.


पाहा संपूर्ण सामना



वन वर्ल्ड संघ - अल्विरो पीटरसन, सचिन तेंडुलकर (C), सुब्रमण्यम बद्रीनाथ, इरफान पठाण, नमन ओझा (WK), उपुल थरंगा (WK), अजंथा मेंडिस, अशोक डिंडा, डॅनी मॉरिसन, हरभजन सिंग, मॉन्टी पानेसर, आरपी सिंग.


वन फॅमिला संघ - मोहम्मद कैफ, युवराज सिंग (C), आलोक कपाली, डॅरेन मॅडी, युसूफ पठाण, पार्थिव पटेल (WK), रोमेश कालुविथराना (WK), चामिंडा वास, जेसन क्रेझा, मखाया एनटिनी, मुथय्या मुरलीधरन, व्यंकटेश प्रसाद.