मुंबई : टीम इंडियाचा कोच रवी शास्त्रींनी म्हटलं आहे की, कोणते खेळाडू संघाचा भाग असतील. शास्त्रींनी फक्त फिट खेळाडुंनाच जे फिल्डिंगमध्ये चांगली कामगिरी करु शकतील अशाच खेळाडुंना घेण्यात येईल असं स्पष्ट केलं आहे. श्रीलंकेला ३-० ने हरवल्यानंतर त्यांनी म्हटल की, चांगल्या फॉर्ममध्ये आहे.


शास्त्रींनी म्हटलं की, 'जेव्हा आम्ही २०१९ मधल्या वर्ल्ड कपचा विचार करतो तेव्हा माझं स्पष्ट मत असतं की, जो संघ वर्ल्डकपला खेळेल त्यामधील खेळाडू हे पूर्णपणे फिट असतील आणि फिल्डींगच्या बाबतीत श्रेष्ठ असतील. ते आपला फिटनेस कायम ठेवतील त्यांनाच पुढे संधी देण्यात येईल असं देखील त्यांनी म्हटलं.