सचिन तेंडुलकरचा हा रेकॉर्ड विराट कोहलीच मोडू शकतो - इरफान पठाण
विराट कोहलीबाबत इरफान पठाणचं मोठं वक्तव्य
मुंबई : भारताचा कर्णधार विराट कोहली त्याच्या क्षमता आणि फिटनेच्या जोरावर महान फलंदाज सचिन तेंडुलकरच्या 100 आंतरराष्ट्रीय शतकाचा विक्रम मोडू शकतो असे मत भारताचा माजी अष्टपैलू इरफान पठाण याने व्यक्त केलं आहे. स्टार स्पोर्ट्स शोमध्ये इरफान खान म्हणाला की, 'मला खात्री आहे 100 शतके, तो यावर बोलत नसेल तरी सर्वांना ठाऊक आहे की सचिननंतर जर कोणी हे करू शकत असेल तर तो कोहली आहे.'
इरफान पठाण म्हणाला की, 'त्याने फारच कमी कालावधीत बरेच काही साध्य केले आहे. मला आशा आहे की 100 शतकांचा विक्रम मोडणारा खेळाडू भारतीय असेल. विराटमध्ये क्षमता आणि फिटनेस आहे. जो त्या टप्प्यावर पोहोचण्यासाठी खूप महत्वाचा आहे. 31 वर्षीय कोहलीने आतापर्यंत 70 आंतरराष्ट्रीय शतके ठोकले आहेत. त्याने 248 एकदिवसीय सामन्यात 43 शतके आणि 86 कसोटीत 23 शतके केली आहेत. सचिनने कसोटी सामन्यात 51 शतके आणि वनडेमध्ये 49 शतके ठोकली आहेत.
पठाण म्हणाला की, ''मला वाटतं की कोहली 100 आकड्यापासून 30 ने मागे आहे. मी आशा करतो की सेवानिवृत्ती घेण्यापूर्वी तो हे साध्य करेल. मला आशा आहे की हे लक्ष्य त्याच्या मनात असेल. या वर्षाच्या अखेरीस भारताला ऑस्ट्रेलियाला दौऱ्यावर जायचं आहे. या दौर्यात कोहलीची कामगिरी संघासाठी खूप महत्त्वाची ठरेल.''